Neera Devghar Dam
Neera Devghar DamAgrowon

Nira Devghar Dam : नीरा-देवघर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारकडून ३५९१ कोटींचा निधी

Irrigation Project : सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतील शेतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नीरा देवघर सिंचन प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ३५९१.४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
Published on

Solapur News : सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतील शेतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नीरा देवघर सिंचन प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ३५९१.४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला होता.

या निर्णयाद्वारे नीरा देवधर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारने अंतिम गुंतवणूक मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती येणार आहे. सातारा जिल्ह्यातील भोर, खंडाळा, फलटण, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आदी भागांना याचा मोठा लाभ होईल. सोलापूरसह सातारा जिल्ह्यातील या दुष्काळी भागासाठी नीरा-देवघर पाणीप्रकल्प महत्त्वाचा आहे.

Neera Devghar Dam
Irriagation Management : पाट पाण्याचा कार्यक्षम वापर

अनेकवर्षे हा प्रकल्प रखडला होता. याबाबत ३ ऑक्टोबरला दिल्लीत केंद्रीय जलशक्ती विभागाच्या अर्थ व गुंतवणूक समितीची बैठक झाली. या बैठकीस माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जलशक्ती मंत्रालयाच्या सचिव देबश्री मुखर्जी, जलशक्ती मंत्री यांचे खासगी सचिव उदय चौधरी, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता गुणाले, नीरा देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कोडुलकर आदी उपस्थित होते.

Neera Devghar Dam
Neera Devghar Dam : ‘नीरा देवघर’च्या पाचशे कोटींच्या कामांना लवकरच सुरवात

या बैठकीत हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली होती.

त्यानुसार आता या प्रकल्पाला केंद्र शासनाकडून निधी मिळाला आहे. तर त्यात राज्य शासनाच्या हिश्शाचे ४० टक्के अनुदानही यापूर्वीच मंजूर झालेले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन्ही बाजूंकडून या योजनेला मूर्त स्वरूप मिळाले आहे. त्यामुळे लवकरच या योजनेच्या कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com