आज आपण सोयाबीन, कापूस, कारली, कांदा आणि खरबुज बाजाराची माहिती घेणार आहोत.सोयाबीन स्थिरावलेदेशातील बाजारात सोयाबीनचा भाव सध्या स्थिरावला आहे. सोयाबीनला सोयातेलासाठी उठाव आहे. तर सोयापेंडलाही मागणी आहे. यामुळे सोयाबीनचा भाव टिकून आहे. सध्या प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ६०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. सोयाबीनला उठाव असल्याने सोयाबीनचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस आवक स्थिरबाजारात मागील काही दिवसांपासून कापसाची बाजारातील आवक स्थिर आहे. सीसीआयने कापूस खरेदी यंदा लवकर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सीसीआयची विक्री आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव यामुळे कापसाचा भाव दबावात आहे. यामुळे सध्या बाजारात कापसाची आवक सरासरीपेक्षा काहीशी अधिक दिसत आहे. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ४०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. आणखी काही दिवस कापूस बाजारात यादरम्यान राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून .कारल्याचा भाव टिकूनराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कारल्याचा भाव स्थिरावला आहे. बाजारातील कारल्याची आवक काहिशी कमी आहे. तर कारल्याला उठाव चांगला आहे. कारल्याची केवळ मोठ्या बाजारांमधील आवक १०० क्विटलपेक्षा अधिक आहे. इतर बाजारांमधील आवक कमी आहे. तर सध्या कारल्याला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कारल्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारल्याचा भावही टिकून राहील, असा अंदाज कारली बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत. .Agrowon Podcast: गहू दरावर दबाव; सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, बेदाण्याला उठाव तर भेंडीचे दर टिकून.कांदा दबावातबाजारातील कांद्याची आवक वाढल्यानंतर कांद्याचा भाव दबावात आला आहे. बाजारातील आवक सध्या वाढत आहे. पुढील काही दिवसांमध्ये आवकेत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. कांदा पिकाला वाढलेल्या उष्णतेचाही फटका बसत असल्याचे काही भागातील शेतकरी सांगत आहेत. सध्या बाजारात कांदा सरासरी ७०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेनुसार विकला जात आहे. कांदा निर्यातीवरही युध्दाचा परिणाम जाणवत आहे. तसेच आवक काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या भावावरील दबावही कायम राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .खरबुजाला उठावराज्यातील बाजारात सध्या खरबुजाची आवक वाढत आहे. तसेच दुसरीकड वाढत्या उन्हामुळे खरबुजाला मागणीही चांगली आहे. यामुळे खरबुजाचा भाव काहिसा स्थिरावला आहे. राज्यात यंदा खरबुजाची लागणही सरासरीपेक्षा कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या बाजारात खरबुजाला प्रतिक्विंटल सरासरी १७०० ते २ हजारांचा भाव मिळत आहे. खरबुजाची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये सुधारण्याची शक्यता असली तरी मागणी चांगली राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापारी सांगत आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.