Nira Devghar Dam : ‘भाटघर’, ‘नीरा-देवघर’मधून पाणी सोडणे बंद करावे

Bhatghar dam : दुष्काळाच्या नावाखाली तालुक्यातील भाटघर आणि नीरा-देवघर धरणातून पूर्वेकडील भागाकरिता पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
Nira Devghar Dam
Nira Devghar DamAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘दुष्काळाच्या नावाखाली तालुक्यातील भाटघर आणि नीरा-देवघर धरणातून पूर्वेकडील भागाकरिता पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणातील पाणीसाठा ४० टक्यांनी कमी आहे.

त्यामुळे भोर तालुक्यातील जनतेचा पिण्याचा पाण्याचा आणि शेतीच्या पाणीटंचाईचा विचार करता धरणातून जास्त पाणी सोडणे फायदेशीर नाही. त्यासाठी पुढील दोन दिवसांत धरणातून पाणी सोडणे बंद करावे, अन्यथा आंदोलन करू,’’ असा इशारा आमदार संग्राम थोपटे यांनी दिला.

शनिवारी (ता.१३) थोपटे यांनी त्यांच्या रायरेश्वर कार्यालयात यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला. ते म्हणाले, ‘‘२३.७५ टीएमसी क्षमतेच्या भाटघर धरणात गेल्यावर्षी या काळात ८९.७८ टक्के पाणीसाठा होता. तो यावर्षी ६७.४४ टक्के आहे. तर ११.९२ टीएमसी क्षमतेच्या नीरा-देवघर धरणात सध्या ६१.४५ टक्के पाणीसाठा आहे.

Nira Devghar Dam
Drought Compensation : दुष्काळग्रस्तांना मदत कधी

गेल्या वर्षी तो ९५.०६ टक्के होता. भविष्यातील पाणीटंचाईबाबत जलसंपदा विभागाला २६ डिसेंबरला पत्र दिले होते. मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. भाटघरमधून १ हजार ६१४ क्यूसेकने, तर नीरा-देवघरमधून ७५० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.

Nira Devghar Dam
Drought Management : दुष्काळ, पशुधन अन् ग्रामपंचायतीचे कार्य

याशिवाय वीर धरणाच्याही डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडले आहे. सध्या वीर धरणात ५६.८१ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी तो ६३.८८ टक्के होता. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गुणंद, सारोळा, केंजळ व इंगवली आदी गावांमधील शेतीपंपांना पाणी मिळणार नाही. त्यामुळे भाटघर, नीरा-देवघर आणि वीर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद करावा.’’

सल्लागार समितीवर आरोप

जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याच्या नियोजनासाठी आणि पाण्याचा विसर्ग करण्यासाठी असलेल्या कालवा सल्लागार समितीमध्ये पालकमंत्री अध्यक्ष तर आमदार संग्राम थोपटे हे सदस्य आहेत. मात्र कालवा समितीची बैठक ही अचानक घेतली जाते आणि आमच्या शिफारशीशिवाय पाणी सो़डण्यात येत आहे. त्यामुळे कालवा सल्लागार समितीवरही आमदार संग्राम थोपटे यांनी नाराजी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com