Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : कोरड्या नद्यांमुळे पाणीप्रश्न गंभीर

वाडा तालुक्यात १७० गावे व २५० हून अधिक पाडे आहेत. तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. तालुक्यात औद्योगिकीकरणाचा ओढा वाहत आहे.

Team Agrowon

Wada News : तालुक्यात बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, पिंजाळ, गारगावी, देहर्जे व तानसा अशा नद्या आहेत; मात्र नियोजनाअभावी यातील काही नद्या कोरड्या पडतात. तानसा नदीवर बंधारे नसल्याने ती नदी मार्चअखेरपर्यंत कोरडी पडते.

त्यामुळे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो. यासाठी या नदीवर काही किलोमीटर अंतरावर बंधारे बांधावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

वाडा तालुक्यात १७० गावे व २५० हून अधिक पाडे आहेत. तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. तालुक्यात औद्योगिकीकरणाचा ओढा वाहत आहे.

मात्र त्यामानाने पाणी समस्येचे निराकरण होत नाही. येथे औद्योगिकीकरणामुळे रोलिंग मिल, शीतपेये कारखाने आले आहेत. या कंपन्यांना पाण्याची मोठी गरज असल्याने पाण्याचा मोठा उपसा होत आहे.

यापूर्वी तानसा नदीवर काही ठिकाणी बंधारे बांधले आहेत. या वर्षी तानसा नदीवर एकही नवीन बंधाऱ्याचे काम नाही. नवीन बंधारे मंजूर झाल्यास पाणी समस्या भेडसावणार नाही.
किशोर औचार, शाखा अभियंता, लघुपाटबंधारे उपविभाग, वाडा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात

Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार

Mahabeej Jan Sanwad : महाबीज जनसंवाद कार्यक्रमातून जनजागृती

Farmer Support: संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे : सावे

Chandwad Drought : चांदवडचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

SCROLL FOR NEXT