Fruit Crop Irrigation : उन्हाळ्यात कमी क्षेत्रावरिल फळबागेला पाणी द्या मडका सिंचनाने

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना अवलंबणे गरजेच आहे. त्यासाठी फळझाडांना आच्छादनाचा वापर, सावली करणे, मटका सिंचन, ठिबक सिंचन, परावर्तकाचा वापर यासारखे पाणी बचतीचे व पाणी काटकसरीने वापरण्याचे अनेक उपाय करता येतील.
Fruit Crop Irrigation
Fruit Crop IrrigationAgrowon
Published on
Updated on

उन्हाळ्यात उपलब्ध पाण्याचा संरक्षक पाणी म्हणून काटकसरीने वापर करुन फळबागा जगविणं अत्यंत गरजेच असतं. फळबागेची पाण्याची गरज ही जमिनीचा प्रकार, फळबागेची अवस्था, हवामान आणि हंगामानुसार बदलते.

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना अवलंबणे गरजेच आहे. त्यासाठी फळझाडांना आच्छादनाचा वापर, सावली करणे, मटका सिंचन (Mataka Sinchan), ठिबक सिंचन (Drip Irrigation), परावर्तकाचा वापर यासारखे पाणी बचतीचे व पाणी काटकसरीने वापरण्याचे अनेक उपाय करता येतील.

अतितीव्र पाणी टंचाई परिस्थितीत पाण्याचा दुरुपयोग आणि अपव्यय टाळण्यासाठी पहिल्यांदा फळझाडाभोवती आळे किंवा वाफा तयार करणं गरजेच ठरतं.

अशावेळी झाडाचे वय, आकारमान, जमिनीचा प्रकार आणि उतार लक्षात घ्यावा. यामधील मातीचा पृष्ठभाग सपाट करावा म्हणजे पाणी सम प्रमाणात देण्यास मदत होईल. 

Fruit Crop Irrigation
Fruit Crop Management : कमी तापमानात फळबागेत करा हे उपाय

जास्त अंतरावरील फळझाडांच्या लागवडीत मटका सिंचन पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. कमी क्षेत्रातील फळझाडांना ही पद्धत निश्चित परवडणारी आहे. या पद्धतीमुळे ७० ते ७५ टक्के पाण्याची बचत होते.

दोन ते तीन वर्ष वयाच्या झाडाकरिता ५ ते ७ लिटर क्षमतेची लहान मडकी वापरावीत. त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडाकरिता १० ते १५ लिटर क्षमतेची मडकी वापरावीत. मडकी जर पक्की भाजलेली असतील तर मडक्याच्या बुडाकडील बाजूस लहानसे छिद्र पाडावे.

त्यामध्ये कापडाची चिंधी किंवा नारळाची शेंडी बसवावी. मडक्याच्या आकाराचा खड्डा खोदून मडके गळ्यापर्यंत जमिनीत पुरावे. त्यामध्ये संध्याकाळी पाणी भरुन ती मडक्याचे तोंड झाकून टाकावे. 

मडक्याप्रमाणेच फळबागेत सलाईनच्या बाटल्यांचा वापरही करता येतो. सलाईनच्या बाटल्यात पाणी भरुन ती बाटली खोडास लटकवतात.

झाडाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये १ इंच व्यासाचा पाईप करुन त्यामध्ये सलाईनच्या बाटलीची नळी सोडतात. त्यामुळे थेंब - थेंब पाणी प्रत्यक्ष मुळाला मिळते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com