Water Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : वसई-विरारकरांची पाणी समस्या मिटणार

Team Agrowon

Vasai News : यंदा समाधानकारक पाऊस बरसल्यामुळे वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली असून नागरिकांना जलदिलासा मिळाला आहे. सूर्या-धामणी ९८ टक्के, तर उसगाव आणि पेल्हार धरणात १०० टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. वरुणराजाच्या कृपेने आगामी काळासाठी पाणीसमस्या मिटणार आहे.

वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. त्यामानाने पाण्याची निकड अधिक आहे. इमारती, बैठी घरे, औद्योगिक वसाहतीला पाणी वितरण केले जाते, तसेच वाढत्या नागरीकरणामुळे नव्याने नळजोडणीदेखील दिली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी होत असते.

एमएमआरडीएच्या माध्यमातून सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनादेखील कार्यान्वित करण्यात आली. वसई-विरार शहराला तीन धरणातून पाण्याचा पुरवठा केला जातो, मात्र धरणांच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पावसाचे प्रमाण महत्त्वाचे ठरते.

यंदा पालघर जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे धरणे काठोकाठ भरली आहेत. सर्वाधिक पाणीसाठा असलेले सूर्या धामणी धरण भरले असल्याने हा पाणीसाठा भविष्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

पाणी वितरणाचे नियोजन सुरू

एकीकडे नवी नळजोडणी देण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. अशातच जुन्या नळधारक करदात्यांना पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा हा समाधानकारक असल्याने प्रशासनाकडून पाणी वितरणाबाबत नियोजन केले जाणार आहे.

मुंबईसाठीदेखील मुबलक साठा

पालघर जिल्ह्यात समाविष्ट असणाऱ्या व मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, मोडक सागर १०० टक्के भरले आहे. मध्य वैतरणा ९९ . २६ टक्के भरले आहे. त्यामुळे मुंबईलादेखील पाणीसाठा हा मुबलक प्रमाणात मिळणार आहे.

खोलसा पाडा धरणाचा अतिरिक्त साठा

खोलसा पाडा २ धरणातून वसई-विरार शहरासाठी ६० एमएलडी पाणी मिळणार आहे. या धरणाचे काम सुरू असून त्यातील खोलसापाडा १ चे काम पूर्ण झाले आहे. टप्पा २ चे काम ८० टक्के पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे लवकरच महापालिका क्षेत्राला या धरणातून पाणी मिळावे, यासाठी महापालिका प्रशासनाचे नियोजन असणार आहे.

शहरासाठी पाणीपुरवठा करणारी धरणे (एमएलडीमध्ये)

धरण धरण क्षमता उपयुक्त साठा टक्के

सूर्या धामणी २७६.३५ २७५.८९८ ९९.८५

उसगाव ४.९६ ४.९६ १००

पेल्हार ३.५६ ३.५६० १००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E Peek Pahani : शेतकरी स्तरावरील पीकपेरा नोंदणी ६२ टक्क्यांवर थांबली

Rain Update : परभणी, हिंगोलीत २५ मंडलात सरासरीहून कमी पाऊस

Paddy Disease : भातावर बगळ्या, तर नागलीवर करप्याचा प्रादुर्भाव

Dog Bite : श्वान दंश टाळण्यासाठी हात खाली ठेवा, जमिनीकडे पहा ः डॉ. भिकाने

Pm Kisan Installment : नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्याचं ५ ऑक्टोबरला होणार वितरण

SCROLL FOR NEXT