Ramadara Water Project Agrowon
ॲग्रो विशेष

Krushna Valley Water : कृष्णा खोऱ्यातील पाणी डिसेंबरअखेर तुळजापुरात

Ramdara Water Project : पश्‍चिम महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा खोऱ्यातील पाणी डिसेंबरअखेर तुळजाभवानी मातेच्या चरणी रामदरा प्रकल्पात दाखल होत आहे.

Team Agrowon

Dharashiv News : पश्‍चिम महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा खोऱ्यातील पाणी डिसेंबरअखेर तुळजाभवानी मातेच्या चरणी रामदरा प्रकल्पात दाखल होत आहे. या पाण्याच्या वाटपाची पुढील आखणीही पूर्ण झाली आहे.

तुळजापूरसह उमरगा आणि लोहारा तालुक्यातील एकूण सात हजार ७८ हेक्टर क्षेत्र पाण्यामुळे बारमाही सिंचनाखाली येणार आहे. रामदरा ते बोरी - एकुरगा या टप्पा क्रमांक सहामधीलल पाणी वितरणाच्या कामाला आता वेग आल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

कृष्णा खोऱ्यात मराठवाड्याचा दहा टक्के भूभाग आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील पाण्यावर मराठवाड्याचा न्याय्य हक्क आहे. कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्यासाठी २००१ मध्ये मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. हक्काच्या २३.२२ टीएमसी पाण्यापैकी सात टीएमसी पाण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी महायुती सरकारने ११ हजार ७२६ कोटी रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.

त्यानुसार सिंदफळ येथील पंपगृहातून डिसेंबर २०२४ अखेरीस २.२४ टीएमसी पाणी तुळजाभवानी देवीच्या चरणी असलेल्या रामदरा तलावात दाखल होत आहे. रामदरा येथून हे पाणी बोरी - एकुरगा आणि तेथून बंद पाइपलाइनद्वारे तुळजापूर, लोहारा आणि उमरगा तालुक्यांत जाणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

पाणी वितरणाच्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, प्राधान्यक्रम मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात सगळी कामे हाती घेण्यात येणार आहेत. पाणी वितरणाच्या सहाव्या टप्प्यात नव्याने बांधकाम केलेले आणि यापूर्वी अस्तित्वात असलेल्या दहा साठवण तलाव आणि बॅरेजेसमध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातून आलेले हे पाणी साठवले जाणार आहे. साठवण तलावांची संख्या आठ असून, नव्याने दोन बॅरेजेस तयार करण्यात आले आहेत. तुळजापूरातील दोन हजार हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षेत्र कृष्णेच्या पाण्यामुळे निर्माण होत आहे.

...तर दहा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

सिंदफळ येथील पंपगृहातून रामदरा तलावापर्यंतचा पाचवा टप्पा पूर्ण झाला आहे. डिसेंबरअखेरीस पाणी रामदरा तलावात येऊन पडेल. त्यानंतर पाणी वितरणाच्या सहाव्या टप्प्यात तुळजापूर, लोहारा आणि उमरगा या तीन तालुक्यांतील साडेसात हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यासाठी ८५ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनचे नियोजन आहे. रामदरा पंपगृहातून उपसा सिंचनने बोरी - एकुरगापर्यंत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेले जाणार आहे.

तेथून गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून तुळजापूरसह लोहारा आणि उमरगा तालुक्यात पाइपलाइनद्वारे हे पाणी वाटेत येणाऱ्या आठ तलाव आणि दोन बॅरेजेस मध्ये भरून घेतले जाणार आहे. यामुळे खर्चात बचत होणार आहे. पुढे ते बंद पाइपलाइनद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी देण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे सिंचन क्षमतेत चाळीस टक्के वाढ होणार आहे. परिणामी, सिंचन क्षेत्र दहा हजार हेक्टरपर्यंत वाढणार आहे. या दहा साठवण तलावाची क्षमता दोन टीएमसीपेक्षा अधिक असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supriya Sule : आमदार विकत घेता येतात, मग शेतकऱ्यांसाठी पैसे का खर्चत नाही

Voting Awareness : अकलूजला मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती

Sugarcane Season 2024 : ‘कादवा’चे यंदा साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Water Storage : सांगलीतील प्रकल्पांत ८१ टक्के पाणीसाठा

Mandalik Sugar Ethanol : मंडलिक साखर कारखान्यास इथेनॉल उत्पादनास परवानगी; माजी खासदार संजय मंडलिक यांची माहिती

SCROLL FOR NEXT