Suptiya Sule
Suptiya SuleAgrowon

Supriya Sule : आमदार विकत घेता येतात, मग शेतकऱ्यांसाठी पैसे का खर्चत नाही

Supriya Sule Speech : चांदवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीष कोतवाल यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (ता. १४) खासदार सुप्रिया सुळे यांची सभा झाली. या वेळी खासदार सुळे यांनी भाजपचे धोरण आणि कामकाजावर प्रश्न उपस्थित केले.
Published on

Nashik News : भाजपला एवढे पैसे देऊन आमदार विकत घेता येतात, ते त्यांचे धोरण असावे. हेच पैसे ते शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी का खर्च करत नाही. एवढे पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर, दूध, सोयाबीन, कांदा या सगळ्यांचाच प्रश्न सुटला असता, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली.

चांदवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीष कोतवाल यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (ता. १४) खासदार सुप्रिया सुळे यांची सभा झाली. या वेळी खासदार सुळे यांनी भाजपचे धोरण आणि कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या, ‘‘या पक्षाला सामान्य नागरिक, महिला आणि शेतकरी याविषयी काहीही आस्था नाही.

Suptiya Sule
Supriya Sule : कृषी विभागात १८० कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

त्यामुळे या सरकारला खाली खेचण्यासाठी येत्या निवडणुकीत जबाबदारीने मतदान करावे. राज्यात येणारे सरकार महिलांचा सन्मान आणि संरक्षण करणारे असावे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणारे असावे.

शेतीमालाला हमीभाव मिळेल, अशी व्यवस्था करणारे असावे. पक्ष फोडून भाजपच्या सत्तेत सामील झालेल्या लोकांना काय हवे होते, हे स्पष्ट आहे. ते कितीही विकासाचा दावा करीत असले तरी, खरे तर त्यांना त्यांच्या घरचा विकास करायचा होता, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला.

Suptiya Sule
Supriya Sule : महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्याचे प्रश्न सुटतील

बहीण आताच कशी लाडकी झाली?

सध्याचे सरकार लाडकी बहीण योजनेचा खूप गाजावाजा करते. मात्र ही बहीण आत्ताच कशी लाडकी झाली? असा प्रश्न त्यांनी केला. खरे तर, सर्वांत लाडकी बहीण मी आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत मी लाडकी नव्हते.

तुम्ही असा दणका दिला, लगेच आता लाडकी झाले. या लोकांना पंधराशे रुपये देऊन महिलांची मते विकत घेता येतात, असा भ्रम आहे. मात्र सगळीच नाती पैसे देऊन विकत घेता येत नाहीत. त्यांची अशी भावना होण्यामागे ‘५० खोके,एकदम ओके’ हे कारण आहे. आमची ताकद मात्र आमची इमानदारी हीच आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असे खासदार सुळे या वेळी म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com