Nashik News : कादवा सहकारी साखर कारखान्याची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विकासाची वाटचाल कायम ठेवली आहे. 'कादवा'ला ऊस देण्यासाठी जिल्ह्यातील ऊस उत्पादक पसंती देत आहे. ऊस तोडणीचे पूर्ण नियोजन करत कार्यक्षेत्रात ३७७१ गेट केन ३०३२ असे एकूण ६८०३ हेक्टर ऊसाची नोंद झालेली असून सुमारे चार ते साडे चार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले, असल्याचे प्रतिपादन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.
कादवाच्या ४८ व्या गळीत हंगाम गव्हाणपुजन समारंभ बुधवारी (ता. १३) रोजी श्रीराम शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते, सर्व संचालक, सभासद व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून करण्यात आला. यावेळी शेटे बोलत होते.
शेटे म्हणाले, की कमी दिवसात जास्तीचे गाळप होणे अत्यावश्यक आहे अजून एक हजार टन गाळप क्षमता वाढविण्याचा विचार आहे. मात्र कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध झाल्यास त्याबाबत पुढील हंगामात विचार केला जाईल. इथेनॉल प्रकल्पातून बी हेव्ही मोलॅसेसपासुन इथेनॉल निर्मिती पूर्ण क्षमतेने केली जाणार आहे.
ऊसतोड मजूर संकट वाढू लागले आहे. त्यातच वाहतूक खर्च वाढला आहे. त्याचा परिणाम एफआरपी वर होत आहे. तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी ऊस तोड करून पोहचवण्याचा पर्यायावर विचार करणे आवश्यक आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून साखरेचे किमान मूल्य दर वाढणे गरजेचे आहे. साखर संघ केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा करत आहे.तरी साखर उद्योग वाचविण्यासाठी साखरेचे किमान मूल्य वाढणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी एकरी ऊस उत्पादन वाढविण्याची गरज असून ऊस लागवड करत तो कादवालाच पुरवावा, असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.
यावेळी दत्तात्रय पाटील, माजी संचालक संजय पडोळ, विलास कड, जयराम डोखळे, श्याम हिरे, बोपेगावचे सरपंच वसंत कावळे, कामगार युनियनचे अध्यक्ष भगवान जाधव, बाळासाहेब नाठे, विठ्ठलराव अपसुंदे, बापू पाटील यांची भाषणे झाली. माजी आमदार रामदास चारोस्कर, बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, राज्य बँकेचे अधिकारी किरण धोंडगे, राज्य उत्पादन शुल्क कोंडे, तसेच सर्व संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, प्र. कार्यकारी संचालक विजय खालकर आदींसह अधिकारी, कामगार आणि ऊसतोड कामगार उपस्थित होते. संचालक शहाजी सोमवंशी यांनी स्वागत केले. अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सुखदेव जाधव यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.