Voting Awareness : अकलूजला मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती

Election Commission : माळशिरस विधानसभा मतदारसंघ (अ.जा.) अंतर्गत मतदार जनजागृतीकरिता प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत.
Voting Awareness
Voting Awareness Agrowon
Published on
Updated on

Solapur News : माळशिरस विधानसभा मतदारसंघ (अ.जा.) अंतर्गत मतदार जनजागृतीकरिता प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्याअंतर्गत अकलूज नगर परिषद व जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत मानवी साखळीद्वारे भारत देशाचा नकाशा तयार करून शंभर टक्के मतदान करणे बाबत संदेश देण्यात आला.

जास्तीत जास्त मतदारांनी २० नोव्हेंबरला सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले. अकलूज नगरपरिषद कार्यालय समोरील प्रंगणामध्ये ३० बाय ३० फूट मापाचा भारत देशाचा नकाशा तयार करण्यात आला.

Voting Awareness
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानासाठी १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य

या उपक्रमामध्ये अकलूज येथील अकलाई विद्यालय तसेच जैन महावीर मंदिर विद्यालय येथील सुमारे २०० विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीने भारत देशाचा हुबेहूब नकाशा तयार करून मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता सर्वांनी शंभर टक्के मतदान करणेबाबत आवाहन करण्यात आले.

Voting Awareness
Maharashtra Election 2024 : लोकशाही बळकटीकरणासाठी उत्स्फूर्तपणे मतदान करावे

तसेच याद्वारे भारतातील सर्व नागरिक यांनी लोकशाही वर निष्ठा ठेवून आगामी विधानसभा निवडणुकीत निर्भयपणे कोणत्याही धर्म,वंश, समाज, भाषा यांचे प्रभावाखाली न येता तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करणेबाबतही आवाहन करण्यात आले.

या उपक्रमामध्ये स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्याधिकारी अकलूज नगरपरिषद दयानंद गोरे, प्रभाकर विठ्ठल ननवरे व मुख्याध्यापक उमा जाधव, मुख्याध्यापक पठाण पी. ए., राजश्री खरात, दत्तात्रय गायकवाड, अनुपमा वसेकर, प्रदीप सातपुते, हमीद मुलाणी, उमेश फलटणकर, संतोष उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com