Jaltara Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Jaltara Yojana : वाशीम जिल्ह्यात ‘जलतारा’ कामांना गती

Water Conservation : वाशीम तालुक्यात भटउमरा गावात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते बुधवारी (ता.१२) जलतारा प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांचे निरीक्षण करण्यात आले.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यात जलतारा प्रकल्पांतर्गत पाणी व्यवस्थापनाची कामे युद्ध पातळीवर सुरू झाली आहेत. या कामांना गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध गावांमध्ये श्रमदान आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

वाशीम तालुक्यात भटउमरा गावात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते बुधवारी (ता.१२) जलतारा प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांचे निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्वतः श्रमदान करून गावकऱ्यांना प्रोत्साहित केले.

यावेळी गावकऱ्यांनी दोन हजार जलतारा शोषखड्डे घेण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाला सरपंच गोदावरी काळे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. हरीश बाहेती, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, तहसीलदार निलेश पळसकर, गटविकास अधिकारी रवींद्र सोनवणे, श्रीकृष्ण महाराज राऊत, पाणी फाउंडेशनचे सुभाष नानोटे आणि अविनाश मारशेटवार यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. म्हणाल्या, 'जलतारा प्रकल्प हा केवळ शासकीय उपक्रम नसून, लोकसहभागातून राबवलेला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. यामुळे पाण्याची बचत होईल आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. प्रत्येक गावकऱ्याने या प्रकल्पात सक्रिय सहभाग घ्यावा.’ आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. बाहेती यांनी जलतारा प्रकल्पाचे महत्त्व सांगितले.

१२ गावांमध्ये होत आहे श्रमदान

आसोला, वाघजाळी, कामठवाडा, कोंडाळा, सुराळा, तोरनाळा, सावंगा, पांडवउमरा, माळेगाव, ब्राम्हणवाडा, चिखली सुर्वे आणि भटउमरा या १२ गावांमध्ये जलतारा प्रकल्पांतर्गत श्रमदान आणि जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Samruddhi Yojana: पैशाचे सोंग आणता येत नाही

Electricity Bill Recovery: महावितरणकडून वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र

Water Rate Extension: पाण्याच्या दरनिश्चितीला मुदतवाढ

Panchanama Scam: ग्रामसेविकेने नुकसानभरपाईत मागितला शेतकऱ्याला वाटा

Gram Rozgar Assistant: ग्रामरोजगार सहायकांवर उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT