Jaltara Project : ‘जलतारा’ची १७ कामे शिराळा तालुक्यात पूर्ण

Water Conservation : शिराळा तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी असणाऱ्या जलतारा योजनेची १७ कामे पूर्ण झाली आहेत.
Jaltara Project
Water ConservationAgrowon
Published on
Updated on

Sangli News : शिराळा तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी असणाऱ्या जलतारा योजनेची १७ कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेचा लाभ शिराळा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन शिराळा पंचायत समितीच्या वतीने उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रवीण तेली यांनी केले आहे.

तेली म्हणाले, ‘‘जलतारा योजनेत सहभागासाठी लघू पाटबंधारे उपविभाग व मनरेगा कक्ष पंचायत समिती येथे संपर्क साधावा. पाण्याचा योग्य निचरा करून भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रत्येक एक एकर शेतामागे एक जलतारा (शोष खड्डा) घेता येतो. जलतारा या योजनेचा मुख्य उद्देश हा जामिनीतील पाणी पातळी वाढविणे आणि जल पुनर्भरण करून शेतजमिनीचे पुनरुज्जिवन करणे हा आहे.

Jaltara Project
Jaltara Project : कोंढाळा झामरे गावात होणार एक हजार ‘जलतारा’

सहज उपलब्ध होणारे गाळणी सयंत्र (फिल्टर मेडिया) वापरून, शेतातील पाणी शेतात अडवून प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळणार आहे. त्याचा उपयोग खरीप तसेच रब्बी पिकांना होणार आहे. त्याचप्रमाणे अकुशल कामामुळे मनुष्य दिन निर्मितीही होणार आहे. योजनेत शेतात जलतारा करण्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रासाठी रक्कम रुपये ४६४३ आणि डोंगरी क्षेत्रासाठी ५२६४ रुपयांचे मॉडेल अंदाजपत्रक तयार आहे.

शेतकऱ्यांना शासनाकडून प्रत्यक्ष काम केलेल्या मोजमापानुसार निधी मिळणार आहे. कुशल व अकुशल (मजुरीची रक्कम) थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. शेतकऱ्यांनी १.५० मीटर लांबी, १.५० मीटर रुंदी व १.८० मीटर खोलीचा खड्डा खोदावा. उपलब्ध विविध व्यासाचे दगड, गोटे, पेबल्स वापरून फिल्टर मेडिया तयार करून रिचार्ज पिट (जलतारा) शोषखड्डा करावा लागणार आहे.

योजनेत सहभागी होण्यागासाठी तसेच तांत्रिक मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) कक्ष आणि लघू पाटबंधारे उपविभाग पंचायत समिती येथे संपर्क साधावा. तांत्रिक मंजुरी ही उपविभागीय जलसंधारण अधिकारी व प्रशासकीय मंजुरी ही गटविकास अधिकाऱ्यांकडून दिली जाते.

Jaltara Project
'Jaltara' Yojna : ‘जलतारा’, ‘शेततळे’ शेतकऱ्यांसाठी लाभदायक

जलतारा योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत असून, आर्थिक मदतीसह (शासन अनुदान) सदरची योजना ही निसर्ग संवर्धनात (जल, जंगल, जमीन) ही मोलाचे बहुमूल्य योगदान देत आहे. सर्व शेतकरी बांधवानी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा. सद्य:स्थितीत शिराळा तालुक्यात जलतारा निर्मितीसाठी १७ अंदाजपत्रकांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे पूर्ण झाली आहेत.

या १७ ठिकाणी झाले जलतारा

कदमवाडी, माळेवाडी, कुसळेवाडी, किनरेवाडी, धसवाडी, भटवाडी, वाकाईवाडी, खुंदलापूर, काळुंद्रे, बेलेवाडी, अस्वलेवाडी, मानेवाडी, मोहरे, मोरेवाडी, पाचगणी, शेडगेवाडी, शिंदेवाडी या १७ ठिकाणी जलतारा काढण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com