जल व्यवस्थापन कृती पंधरवडा Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : कोल्हापुरात ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ कार्यक्रमास सुरुवात

Sustainable water management : जल व्यवस्थापनात कायमस्वरूपी पर्याय म्हणून योग्य सुविधा निर्माण करण्याबरोबरच शाश्वत जल व्यवस्थापन आणि शाश्वत सुविधा निर्माण करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार पाटबंधारे विभागासह सर्व सहभागी शासकीय विभाग, तज्ज्ञ मार्गदर्शक आणि शेतकरी गटांच्या प्रतिनिधींनी केला.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर ः जल व्यवस्थापनात कायमस्वरूपी पर्याय म्हणून योग्य सुविधा निर्माण करण्याबरोबरच शाश्वत जल व्यवस्थापन आणि शाश्वत सुविधा निर्माण करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार पाटबंधारे विभागासह सर्व सहभागी शासकीय विभाग, तज्ज्ञ मार्गदर्शक आणि शेतकरी गटांच्या प्रतिनिधींनी केला.

जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिल दरम्यान जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ राबविण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ शासकीय विश्रामगृहातील सभागृहात करण्यात आला. या वेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हात्रे, प्रमुख वक्ते डॉ. अनिलराज जगदाळे, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. उदय गायकवाड, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, अशोक पवार, देवाप्पा शिंदे उपअधीक्षक अभियंता संजय पाटील यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

पाच जलकलशांचे पूजन करण्यात आले. जिल्ह्यातील प्रमुख पाच नद्यांचे पाणी पाच कलशांमध्ये आणण्यात आले होते. यामध्ये पंचगंगा, वारणा, तम्रपर्णी, दूधगंगा, हिरण्यकेशी या नद्यांचा समावेश होता. या वेळी उपस्थितांना जल प्रतिज्ञाही देण्यात आली.

प्रास्ताविकामध्ये अभिजित म्हेत्रे यांनी येणाऱ्या पंधरा दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून प्रत्यक्षात कृतीवर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. इतर संबंधित विभागांच्या समन्वयाने आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून जलव्यवस्थापनाला गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात ४ मोठे, १२ मध्यम, ५६ लघू प्रकल्प असून ३०२ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. जिल्ह्यात एकूण ७.६८ लाख हेक्टर सिंचन क्षेत्र असून पाटबंधारे विभागाकडे ३.२४ लाख हेक्टर सिंचन क्षेत्र आहे. यातील प्रत्यक्षात २.८४ लाख हेक्टर भिजते, यामध्ये येत्या काळात वाढ करून ते १०० टक्के करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे असे त्यांनी पुढे सांगितले. शेतकरी गटाचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब देवकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी शेतकरी आणि प्रशासनाने समन्वयाने काम केल्यास जल व्यवस्थापन शक्य असल्याचे सांगितले. आभार स्मिता माने यांनी मानले. सूत्रसंचालन प्रशांत कांबळे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Success Story: क्षारपड जमिनीला दिली नवसंजीवनी

Gram Sadak Yojana: रस्त्यांसाठी ६४२९ कोटी मंजूर

Agriculture Technology: कृषी समस्या सोडवणुकीसाठी तंत्रज्ञान स्पर्धा महत्त्वाच्या...

Crop Insurance 2025 : यंदाच्या खरिपातही कमी भरपाई मिळणाची शक्यता जास्त

Stone Picker Machine: ट्रॅक्टरचलित दगड वेचणी यंत्र

SCROLL FOR NEXT