Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनी धरणातील पाणी पातळी ६० टक्क्यांवर

Ujani Dam Water Storage : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात गुरुवारी (ता. १) पुन्हा वाढ झाली.

सुदर्शन सुतार

Solapur News : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात गुरुवारी (ता. १) पुन्हा वाढ झाली. तब्बल ४६ हजार ५३१ क्युसेक इतका विसर्ग उजनी धरणामध्ये येत होता. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून, पाणीपातळी ६०.४७ टक्क्यांवर पोहचली.

गुरुवारी (ता. १) दुपारी तीनच्या आकडेवारीनुसार धरणात एकूण पाणीपातळी ४९४.८९० मीटरपर्यंत गेली. तर एकूण पाणीसाठा ९६.०५ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा ३२.४० टीएमसीपर्यंत पोहचला, तर या पाण्याची टक्केवारी ६०.४७ टक्के एवढी राहिली.

सोलापूर, नगर, पुणे जिल्ह्यांना दिलासा

बुधवारी (ता. ३१) धरणाने ५० टक्क्यांची पाणी पातळी गाठल्यानंतर अवघ्या एकाच दिवसात थेट १० टक्क्यांनी वाढ होत पाणीसाठा ६० टक्यांवर पोहचला. विशेष म्हणजे मागच्या जानेवारीमध्येच धरण उणे ६० टक्क्याच्या पातळीत गेले होते.

पण आता या पाण्यामुळे ती पातळी भरून तर निघालीच, पण पाणीपातळीने अधिकचा ६० टक्क्यांचा टप्पा गाठला. पाण्याच्या वाढत्या साठ्यामुळे सोलापूरसह नगर, पुणे जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT