Ujani Dam Storage : उजनी धरणाची पाणी पातळी ५० टक्केकडे

Ujani Dam Water Level : धरणातून ३० हजार क्युसेकने विसर्ग सुरू
Ujani Dam water storage
Ujani Dam water storageagrowon
Published on
Updated on

Solapur Rain : पुणे जिल्ह्यातील धरणाकडून उजनी धरणामध्ये मंगळवारी (ता. ३०) ३० हजार ८६६ क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याच्या विसर्गात आज पुन्हा वाढ करण्यात आल्याने धरणाची पाणीपातळी वेगाने वाढत असून, मंगळवारी दुपारी ती ४७ टक्केच्या घरात पोचली. उद्या ती ५० टक्केची पातळी गाठणार आहे.

सध्या पावसाने धरणक्षेत्रात आणि धरणाच्या वरच्या बाजूला विश्रांती घेतली आहे. पण विसर्ग सुरूच आहे. सोमवारी १७ हजार ४४ क्युसेकवर विसर्ग होता. पण आज त्यात वाढ करत तो ३० हजार ८६६ क्युसेकवर नेण्यात आला. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने वाढत आहे. पाण्याच्या या वेगानेच धरण उद्या ५० टक्केची पातळी गाठेल, अशी शक्यता आहे.

Ujani Dam water storage
Ujani Dam : उजनी धरणाची पाणी पातळी ७० टक्क्यांकडे

उजनी धरणामध्ये मंगळवारी दुपारच्या आकडेवारीनुसार एकूण पाणीपातळी ४९४.१०० मीटर होती. त्यात एकूण पाणीसाठा ८८.४२ टीएमसी तर त्यापैकी उपयुक्त साठा २४.७६ टीएमसी एवढा राहिला. तर या पाण्याची टक्केवारी ४६.२१ टक्के राहिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com