Water issue Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Issue : मराठवाड्यातील पाणीप्रश्‍नी अधिवेशनपूर्व हवी बैठक

Jansanwad 2024 : मसिआच्या श्रीमती रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृहात रविवारी (ता. १६) झालेल्या ‘जलसंवाद- २०२४’ कार्यक्रमात आयोजक विविध संस्थांनी उपस्थित लोकप्रतिनिंधीसमोर मराठवाडा पाणी प्रश्न संबंधित शासनाकडे मांडावयाचे मुद्दे मांडले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : येथील मसिआच्या श्रीमती रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृहात रविवारी (ता. १६) झालेल्या ‘जलसंवाद- २०२४’ कार्यक्रमात आयोजक विविध संस्थांनी उपस्थित लोकप्रतिनिंधीसमोर मराठवाडा पाणी प्रश्न संबंधित शासनाकडे मांडावयाचे मुद्दे मांडले.

मांडलेल्या मुद्द्यांना शासन दरबारी लावून धरण्यासाठी पहिल्या अधिवेशनापूर्वी मागण्यांविषयी बैठक लावण्याची मागणीही करण्यात आली. यास मंत्री अतुल सावे व इतर सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी यांनी होकार भरला. मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, टीम ऑफ असोसिएशन, मसिआ, मराठवाड्यातील सर्व संलग्न संस्था, साखर कारखाने व शेतकरी सहकारी पाणी वापर संस्थेच्यावतीने मराठवाडा पाणी प्रश्नाविषयी विचार मंथन करण्याकरिता ‘जलसंवाद २०२४’चे आयोजन करण्यात आले होते.

पुढे करण्यात आलेल्या मागण्या...

मराठवाड्याला महाराष्ट्राच्या सिंचन सरासरी बरोबर आणण्यासाठी एकूण १५३ टीएमसी व वाटर ग्रीडसाठी दोन टीएमसी मिळून १५५ टीएमसी पाणी कोकण खोऱ्यातून स्थलांतरित करण्याची पावले त्वरित उचलावी. शिवाय ३४ टीएमसी विदर्भ व ५१ टीएमसी कृष्णा खोऱ्यातून असे एकूण २४० टीएमसी पाणी स्थलांतरित करावे.

जायकवाडीच्या वरच्या भागात नाशिक विभागात जास्तीची ४५ टीएमसीची धरणे बांधली आहेत. तेवढे पाणी कोकण विभागातून वैतरणा मुकणे धरणामार्फत जायकवाडी धरणासाठी उपलब्ध करावे, म्हणजे दोन्ही विभागात समन्यायी पाणी वाटप होण्यास मदत होईल.

शासनाने २०१० पासून दरवर्षी अमरावती विभागास अनुशेष अनुदान अंतर्गत आतापर्यंत ९१४८ कोटी दिले. त्यानुसार मराठवाडा विभागास अनुशेष अनुदान कमीत कमी ५०० कोटी प्रति वर्ष प्रमाणे मागील दहा वर्षासाठी ९१०० कोटीचा हिस्सा मिळावा.

मराठवाडा वॉटर ग्रीड योजना यशस्वी होण्यासाठी नाशिक येथील धरणास पाइप द्वारे जोडावे.

प्रादेशिक वैधानिक विकास मंडळे पुनर्जीवित करावे. मराठवाड्यातील मागास भागास न्याय देण्यासाठी मराठवाडा वैधानिक विकास मंडळ त्वरित कार्यान्वित करावे.

नदीजोड प्रकल्प नाशिक येथे कार्यान्वित कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरित करावे.

मराठवाड्याला समन्यायी पद्धतीने पाणी वाटप होण्यासाठी कार्यकारी संचालक गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजी नगर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करावी.

जायकवाडी धरणावर घातलेल्या ६५ टक्केचा निर्बंध उठविण्यात येऊन, ऊर्ध्व भागातील धरणे व जायकवाडी धरणात समान टक्केवारीनुसार पाणी सोडण्यात यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2025: देशात खरीप पेरणीला वेग; कापूस, सोयाबीन, तूर पिछाडीवर

ZP School Admission : झेडपी शाळेत प्रवेश घेतल्यास होणार कर माफ

Free Sand Policy : घरकुल लाभार्थ्यांना चार टक्केच वाळूचा पुरवठा

Crab Farming : बंदीस्त खेकडा पालन करण्यासाठी प्रोत्साहन

Livestock Support: पशुपालकांना आता मिळणार शेतीसारख्या सवलती; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

SCROLL FOR NEXT