Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Water Demand : ‘खडकवासला’तून सोडावे इंदापूरसाठी पाणी : भरणे

Water Shortage : इंदापूर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.

Team Agrowon

Indapur News : इंदापूर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.

तसेच दुष्काळामुळे तालुक्याच्या विविध भागांत शेतकऱ्यांची हाता-तोंडाशी आलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार दत्तात्रेय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे खडकवासल्यातून इंदापूरसाठी पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली आहे.

श्री. भरणे म्हणाले, ‘‘गेल्या वर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे जवळपास सगळीकडचेच नैसर्गिक स्रोत यंदा लवकर आटल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत.

त्याचबरोबर तालुक्यातील बऱ्याच भागातील उन्हाळी पिके जळून चालली आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे.

यामध्ये विशेषतः तालुक्यातील शेटफळ गढे, लामजेवाडी, निरगुडे, म्हसोबाचीवाडी, लाकडी, वायसेवाडी, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी, रुई, थोरातवाडी, मराडेवाडी, बोराटवाडी, कौठळी, बळपुडी, खामगळवाडी, बिजवडी, पोंदकुलवाडी, तरंगवाडी या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या परिसरात पाण्याचे टँकर चालू आहेत. त्यामुळे खडकवासलातून पाणी सोडावे, अशी मागणी केली आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Update: पाऊस उघडीप देण्याची शक्यता; राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाज

Farmer Relief : ‘गुरुदत्त शुगर्स’च्या मदतीने पूरग्रस्त सुखावले

Crop Loss inspection: २६ जिल्ह्यांमध्ये पंचनामे रखडले; दिवाळीपूर्वी भरपाई मिळेल?

PDKV Akola : कृषी विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान वापरा

Sangli Rainfall : सांगलीत सप्टेंबरमध्ये १४६ टक्के पाऊस

SCROLL FOR NEXT