Water Shortage : राज्यातील दोन कोटी पशुधन तहानलेले

Water Scarcity : राज्यात गाई-म्हशींसह शेळ्या, मेंढ्यांची संख्या ३ कोटी २० लाख १२ हजार आहे. त्यातील साधारण दोन कोटी जनावरांना टंचाईच्या झळा बसत आहेत. जनावरांसाठी पाणी मिळवताना दुष्काळी भागातील पशुपालक जेरीस आले आहेत.
Animal Thirsty
Animal ThirstyAgrowon
Published on
Updated on

Nagar News : राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती पावसाळ्याच्या तोंडावर तीव्र होत आहे. टंचाईग्रस्त गावांत लोकांना पिण्यासाठी टॅंकरने पाणी दिले जात आहे. मात्र जनावरांसाठी सरकारी पातळीवर पाणी पुरवठ्याबाबत कोणत्याही उपाययोजना केलेली नाही. राज्यात गाई-म्हशींसह शेळ्या, मेंढ्यांची संख्या ३ कोटी २० लाख १२ हजार आहे. त्यातील साधारण दोन कोटी जनावरांना टंचाईच्या झळा बसत आहेत. जनावरांसाठी पाणी मिळवताना दुष्काळी भागातील पशुपालक जेरीस आले आहेत.

राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळाचे झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील महसूल मंडळात शासनाने दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेली असून त्या ठिकाणी विविध उपाययोजना करण्याबाबत चार महिन्यांपूर्वीच सुचित्त केलेले आहे. त्यानुसार पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा या संदर्भात विविध उपाय योजना केल्या. अनेक जिल्ह्यांमध्ये चाऱ्याबाबत नियोजन केल्यामुळे चारा टंचाईवर मात करण्यात बऱ्यापैकी यश आल्याचे दिसत आहे.

Animal Thirsty
Pune Water Shortage : पुणे जिल्ह्यात मे अखेरीस पाणीटंचाई तीव्र

पाणीटंचाई निर्माण झालेल्या राज्यातील दहा हजारांपेक्षा अधिक गावांत कोट्यवधी लोकांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. मात्र जनावरांच्या पाण्यासंदर्भात शासनाकडून फारशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणारे ओढे, तलाव गावातला बाजार तलाव यासह अन्य स्रोत बहुतेक ठिकाणी कोरडे पडलेले आहेत. प्रसंगी जनावरांच्या पाण्याबाबत मात्र भटकंती करावी लागत आहे.

पशुवैद्यकांच्या नियमानुसार मोठ्या जनावरांना साधारणपणे दर दिवसाला ३० लिटर, लहान जनावरांना १५ लिटर तर शेळ्या-मेंढ्या १० लिटर पाण्याच्या गरजेनुसार राज्यात दररोज मोठ्या जनावरांसाठी ५७ कोटी ६२ लाख लिटर, शेळ्या मेंढया व इतर जनावरांना २० कोटी लिटर पाण्याची गरज आहे. महिनाभरापासून उन्हाची तीव्रता अधिक असून पाण्याची शारीरिक गरज वाढतीच आहे. मात्र राज्यात सुमारे दोन कोटी जनावरांना पाणीटंचाईच्या गंभीर झळा सोसाव्या लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Animal Thirsty
World Water Forum Conference : जागतिक जलमंच परिषदेमध्ये विविध समस्यांवर चर्चा
संगमनेर तालुक्यातील कोरडवाहू शेतकरी दूध व्यवसाय, पशुपालनाला प्राधान्य देत आहेत. आमच्या सावरगाव तळ गावांत दर दिवसाला पंचवीस हजार लिटर दुधाचे संकलन होते. यंदा बहुतांश भागात दुष्काळामुळे पाणीटंचाई आहे. जनावरांच्या पाण्याची उपाययोजना नसल्याने आम्हा पशुपालकांना जनावरांच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
बाळासाहेब शेटे, दूध उत्पादक, सावरगाव तळ, ता. संगमनेर

राज्यातील पशुधनाची संख्या

- गाई : १ कोटी ३७ लाख ७५ हजार ८२१
- म्हशी : ५४ लख ३२ हजार ०२८
- मेंढ्या : २६ लाख २३ हजार ७५४
- शेळ्या : १ कोटी ६२ हजार ८२७
- इतर : १ लाख १७ हजार ६३०

२० व्या पशुगणनेनुसार जिल्हानिहाय पशुधन (गाय, म्हैश, शेळ्या, मेंढ्या व इतर)
नगर : ३० लाथ ४० हजार, अकोला : ४ लाख २१ हजार, अमरावती : ९ लाख ८५ हजार, छत्रपती संभाजीनगर : ११ लाख ३४ हजार, बीड : १२ लाख ५५ हजार, भंडारा : ५ लाख ७ हजार, बुलडाणा : १० लाख ५८ हजार, चंद्रपूर : ७ लाख १२ हजार, धुळे : १२ लाख ७१ हजार, गडचिरोली : ७ लाख ९० हजार, गोंदिया : ५ लाख ६० हजार, हिंगोली : ४ लाख ६६ हजार, जळगाव : १३ लाख १४ हजार, जालना : ८ लाख ३० हजार, कोल्हापूर : १० लाख ६० हजार, लातुर : ६ लाख ९२ हजार, नागपूर : ७ लाख ५७ हजार, नांदेड : ११ लाख, नंदुरबार : ७ लाख २५ हजार, नाशिक : १९ लाख १९ हजार, धाराशिव : ७ लाख ५५ हजार, पालघर : ३ लख ९० हजार, परभणी : ५ लाख ७९ हजार, पुणे : १९ लाख ८३ हजार, रायगड : ३ लाख २७ हजार, रत्नागिरी : ३ लाख १० हजार, सांगली : १३ लाख ५१ हजार, सातारा : ११ लाख ८५ हजार, सिंधुदुर्ग : १ लाख ८७ हजार, सोलापूर : २२ लाख ८५ हजार, ठाणे : २ लाख २१ हजार, वर्धा : ४ लाख ६८ हजार, वाशीम : ३ लाख ५२ हजार, यवतमाळ : १० लाख १३ हजार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com