Water Crisis : पालघरमध्ये पाणीटंचाईचे संकट

Water Shortage : ‘सांग सांग भोलेनाथ, पाऊस पडेल का’, अशी परिस्थिती पालघरमध्ये येऊन ठेपली आहे. एकीकडे प्रचंड उकाडा नागरिकांना असह्य करत असताना धरणाचा जलसाठा खालावत आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon

Vasai News : ‘सांग सांग भोलेनाथ, पाऊस पडेल का’, अशी परिस्थिती पालघरमध्ये येऊन ठेपली आहे. एकीकडे प्रचंड उकाडा नागरिकांना असह्य करत असताना धरणाचा जलसाठा खालावत आहे. त्यामुळे पालघरमध्ये जलदुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धामणी धरणाचा साठा हा १९.९४ टक्केच शिल्लक राहिला आहे, तर अन्य धरणातदेखील हीच परिस्थिती दिसून येत आहे.

ग्रामीण भागातील दुर्गम, अतिदुर्गम परिसरात हर घर जल योजनेतून पाणी दिले जाणार आहे, मात्र याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. एकीकडे उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असताना योजनेला घरघर लागली का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. त्यातच नवे संकट येऊन ठेपले आहे.

Water Scarcity
Water Crisis : जलसंकटाचे सावट! नागपूरसह पालघरचे पाडे, गडचिरोलीचा अतिदुर्गम भाग आणि धुळ्यात भीषण पाणी टंचाई

पालघरमधील धरणांतील साठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. यामुळे हवामानात बदल होऊन अवकाळी पाऊस, कडाक्याचे ऊन यांचा परिणाम शेती- बागायतीवर झाला आहे. अशातच सिंचनासाठी व पिण्यासाठी वापरण्यात येणारे धरणातील पाणी पाऊस आला नाही तर तळ गाठू शकते. वसई-विरार शहरातदेखील हीच परिस्थिती दिसून येत आहे.

सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे जरी पाणी आले तरी ते पूर्ण कार्यान्वित झाले नाही. जलवाहिनी अंथरणे आणि जुन्या जलवाहिनी बदलणे या कामासाठी पाणीपुरवठा बंद केला जात आहे, मात्र हे काम पूर्ण केव्हा होणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे. अशातच पाण्याची कमतरता रहिवासी संकुलात जाणवू लागली आहे. जर धरणातील पाणीसाठा असाच कमी होत राहिला, तर जलदुष्काळ फोफावणार आहे.

Water Scarcity
Pune Water Shortage : पुणे जिल्ह्यात मे अखेरीस पाणीटंचाई तीव्र

साठा आणखी खालावण्याची भीती

गतवर्षी जूनमध्ये सूर्या-धामणी धरणात २१ टक्के, तर पेल्हार धरणात पाणी शिल्लक नव्हते. तसेच वैतरणा धरणात केवळ १६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षी मॉन्सून लांबणीवर गेला होता, मात्र यंदा ही परिस्थिती मेमध्येच दिसून येत आहे. त्यामुळे जर पाऊस झाला नाही, तर सद्य:स्थितीतील साठा आणखी खालावण्याची भीती आहे.

टँकरला अच्छे दिन!

वसई-विरार शहरात अनेक गृहसंकुलांना नळजोडण्या मिळाल्या नाहीत. त्यातच तांत्रिक कामामुळे पाणीपुरवठा बंद केला जातो. यामुळे पाणी वितरणावर परिणाम होतात. तसेच जास्त रहिवासी संख्या असलेल्या रहिवाशांना पाणी मुबलक मिळत नाही. परिणामी, टॅंकर मागवावे लागत आहेत. तेही प्रतीक्षेच्या यादीत असतात. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, मात्र टँकरचालकांना अच्छे दिन आले आहेत.

अन्य धरणांतील साठा

वांद्री धरणात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणाची क्षमता ३५.९३८ दशलक्ष घनमीटर आहे. मनोर येथील लघुपाट धरणात ३० टक्के, देवखोप लघुपाट तीन टक्के, विक्रमगड खांड लघुपाट धरणात ३५.६२ टक्के, मोह खुर्द लघुपाट धरणात १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com