Animal Care  Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Crisis : शेतकऱ्याकडून ३०० जनावरांसाठी पाण्याची सुविधा

Animal Care : गिरणा नदीकाठावरील अनेक गावांना मागील अनेक वर्षांच्या तुलनेत यंदाचा दुष्काळ अत्यंत भयावह आहे.

Team Agrowon

Nashik News : गिरणा नदीकाठावरील अनेक गावांना मागील अनेक वर्षांच्या तुलनेत यंदाचा दुष्काळ अत्यंत भयावह आहे. गिरणा नदीकाठावरील गावांमधील पाळीव जनावरांना देखील चारा व पाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे.

खामखेडातील कसाड शिवारातील शेतकरी निंबा पवार यांनी ३०० पेक्षा अधिक जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे. ‘दुष्काळातही माणुसकीचा झरा वाहतोय’ अशीच प्रचिती यामुळे येत आहे.

खामखेडा शिवारातील काळखडी डोंगराच्या पायथ्याशी ३०० गाई व म्हशींसाठी सकाळ व सायंकाळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल, अशा टाक्यांची सोय श्री. पवार यांनी केली आहे.

या वस्तीपासूनच नदीकाठावरून मळ्यात गेलेल्या पाइपलाइनद्वारे त्यांनी दररोज या टाक्या सतत पाण्याने भरलेल्या राहतील, अशी व्यवस्था केलेली आहे. यंदा तीव्र उन्हाने जनावरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. विहिरी दिवसेंदिवस कोरड्या पडत आहेत. अशा काळात श्री. पवार यांनी एक आदर्श घालून दिला आहे.

श्री. पवार हे प्रगतिशील शेतकरी असून, पशुपालकदेखील आहेत. पंधरा वर्षांपासून ते परप्रांतीय काठेवाडी बांधवांच्या ३०० हून अधिकच्या पशुधनाला मुबलक पाणीपुरवठा करतात. यंदा दुष्काळात गिरणा नदीला तीन महिन्यांनी आवर्तन मिळू लागले आहे. सध्या गिरणाचे आवर्तन बंद झाल्याने बेज भादवनपासून ते निंबोळ्यापर्यंत गिरणा नदी कोरडीठाक आहे. त्यामुळे या भागातील मेंढपाळांना देखील पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

आम्ही काठीयावाडी बांधव मागील २५ ते ३० वर्षांपासून खामखेडा गावच्या काळखडी डोंगराच्या पायथ्याशी राहतो. पशुपालन व्यवसायात आमची दुसरी पिढी आहे. पूर्वी पावसाळा चांगला होता. पाण्याची कमतरता भासत नव्हती. पाच वर्षांपासून उन्हाळ्यात चारा व पाण्याचा प्रश्‍न भेडसावतो. निंबा पवार यांनी जनावरांसाठी पाणी दिल्याने दिलासा मिळाला आहे.
- रामा गमारा, पशुपालक, खामखेडा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Irrigation Project: खानदेशातील सिंचन प्रकल्प रखडले

Revenue Day: महसूलच्या अधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते गौरव

Encroachment Free Vanpuri: पुरंदर तालुक्यातील ‘वनपुरी’ ठरले पथदर्शी

ZP School Success: साखराच्या जि.प. शाळेचा प्रेरक प्रवास

PM Kisan: किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी

SCROLL FOR NEXT