Nashik Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Dam Water : नाशिकमधील धरणांतून विसर्ग सुरू

Nashik Rain Update : गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कायम आहे.तर नाशिक शहरासह पश्चिम भागातील सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्‍वर, दिंडोरी तालुक्यांत सर्वदूर अतिवृष्टी झाली.

मुकूंद पिंगळे

Nashik News : जिल्ह्यात शनिवार (ता. २४)पासून पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून पश्‍चिम पट्ट्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १९ महसूल मंडलांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी ओढे-नाले व लहान नद्यांना पूर आले. तर गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात जनजीवन विस्कळीत झाले.

शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी नोंदविली. दिवसभर संततधार होत असल्याने सर्वत्र जलमय परिसर झाला. गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कायम आहे.तर नाशिक शहरासह पश्चिम भागातील सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्‍वर, दिंडोरी तालुक्यांत सर्वदूर अतिवृष्टी झाली. सुरगाणा तालुक्यात सर्वाधिक १४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

या जोरदार पावसामुळे गोदावरीला नदीला पूर आल्याने नदीच्या काठावरील शेतातील भाजीपाला, सोयाबीन ही पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाने नाशिक विभागात ऑरेंज अलर्ट दिलेला होता. अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली.

पावसाचा जोर वाढल्याने अनेक धरणांचा पाणीसाठा वाढण्यात मदत झाली आहे. शनिवारी (ता. २४) सायंकाळनंतर धरणातून विसर्ग वाढविण्यात आला होता. दारणा धरणातून १४,८१२ तर गंगापूर धरणातून ८,४२८ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला होता याशिवाय भावली, भाम, वालदेवी, कडवा, आळंदी या धरणांतून विसर्ग करण्यात आला. मालेगाव, सटाणा, कळवण, नाशिक, निफाड, सिन्नर, देवळा, नांदगाव व येवला तालुक्यांत पावसाचा जोर कमी होता. येथे हलका ते मध्यम पाऊस झाला.

...या महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद

दळवट (६७), उंबरठाणा (१८५), बाऱ्हे (१४३.३), बोरगाव (६७.३), सुरगाणा (१४३.३), उमराळे (६८), ननाशी (१५८), कोशिंबे (७९), लखमापूर (९६.८), इगतपूरी (१०४.३), धारगाव(७७.८), पेठ (१०६.८), जोगमोडी (१२०.३), कोहोर (६८.३) त्र्यंबकेश्‍वर (७३.५), वेलुंजे (८१.५), हरसूल (९९.८), ठाणापाडा (९९.८).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT