Rain Update : बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांत दमदार पाऊस

Rain News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तिन्ही जिल्ह्यांत शनिवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अपवाद वगळता सर्वदूर मध्यम दमदार ते जोरदार पाऊस झाला.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तिन्ही जिल्ह्यांत शनिवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अपवाद वगळता सर्वदूर मध्यम दमदार ते जोरदार पाऊस झाला. तीनही जिल्ह्यांतील २१ मंडलांत अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. पहिल्यांदाच अशा प्रकारे दमदार ते जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे नदी नाले खळाळले. पाणीसाठा वाढीच्या दृष्टीने हा पाऊस महत्त्वाचा मानला जात आहे.

बीड जिल्ह्यात सरासरी ४६.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील बीड तालुक्यात सरासरी ५३.४ मिलिमीटर, पाटोदा ५७.३ मिलिमीटर, आष्टी २७.७ मिलिमीटर, गेवराई ४८.६ मिलिमीटर, माजलगाव ४८.२ मिलिमीटर, अंबाजोगाई ४६.८ मिलिमीटर, केज ४१.९ मिलिमीटर, परळी वैजनाथ ४८.३ किलोमीटर, धारूर ४१.८ मिलिमीटर, वडवणी ६५ मिलिमीटर, शिरूर कासार तालुक्यात सरासरी ५०.९ मिलिमीटर पाऊस झाला.

Rain
Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार शक्य

जिल्हानिहाय पावसाची मंडल (पाऊस मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

उस्मानपुरा, ४०.८, कांचनवाडी २९.९, चिकलठाणा ५५.८, चित्तेपिंपळगाव ५७.३, करमाड ३७.५, हर्सूल ३५.३, कचनेर ५१.५, पंढरपूर २५.५, पिसादेवी २०, शेकटा ३७.८, वरूडकाजी २०, पिंपळवाडी २९.३, बालानगर ३३.३, नांदर ५१.८, लोहगाव ४०.८, ढोरकीन २८.५, बिडकीन ४९.५, पैठण ४९.५, विहामांडवा ५१.५, निलजगाव ४९.५, गंगापूर २८, मांजरी ३८.५, भेंडाळा ५४. ८, तुर्काबाद ३९.३, वाळूज ३१.८, हसूल ३२, डोणगगाव ५९.८, सिद्धनाथ वडगाव २९.८, जामगाव ४३, वैजापूर ४८.५, खंडाळा २०.५ लासूरगाव २२, महालगाव ३५, नागमठाण ४४.५, घायगाव ६३.५, बाबतारा ५२.५, कन्नड ४३, चापनेर ४३, देवगाव रंगारी ३१.३, चिखलठाणा ५०.३, पिशोर २९.५, चिंचोली लिंबाजी ३६.३, करंजखेड ३६.३, नांदर ४८.८, वेरूळ ३४.५, सुलतानपूर ३७, बाजारसावंगी ३७.५, अंभई २०, सावलदबारा २९.५, बनोटी २१.३, जरांडी २५.८, फुलंब्री ४९.३, आळंद २२.८, वडोदबाजार २२.८.

जालना जिल्हा

जालना शहर ३१, जालना ग्रामीण ४९.३, वाघ्रुळ ४३.३, नेर ४५.५, शेवली ३१.८, विरेगाव ४१.८, पाचनवडगाव २८.८, अन्वा २१, हसनाबाद ४५.३, जाफराबाद ३३, माहोरा २२, अंबड ५९.३, धनगरपिंपरी ६२.५, जामखेड ४०.५, रोहीलागड ६४.३, गोंदी ४८.३, वडीगोद्री ३८.३, परतूर ३२.८, वाटूर २८.८, आष्टी ५१.८, सातोना २५.८, बदनापूर ४९.३, दाभाडी २९.८, बावणे पांगरी ६१.८, घनसावंगी २२.८, राणीउंचेगाव ४९, तीर्थपुरी ३८.८, जामसमर्थ ४९.८, मंठा २२.८, ढोकसाळ ३४, पांगरी गोसावी ४१.८.

Rain
Rain Alert : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा मंडलांत अतिवृष्टी

बीड जिल्हा

म्हाळसजवळा ५४.५, राजूरी नवगन ३८.५, पिंपळनेर ३३, पेंडगाव ३८.३, मांजरसुंभा ५०, चौसाळा ४२.८, नेकनूर ४९.५, थेरला ५२, अमळनेर ४१.३, आष्टी २०.८, कडा २०.८, टाकळसिंग ३०.३, धानोरा ३३, पिंपळा ३२.८, गेवराई ५३.५, मादळमोही ३८, जातेगाव ५२.५, पाचेगाव २०.३, धोंडराई ६४.५, उमापूर ७५.८, सिरसदेवी ३७.५, रेवकी ५२, तलवाडा ४३.३, माजलगाव २७.३, गंगामसला २९.३, किट्टीअडगाव ५०.३, तालखेड ४१, अंबाजोगाई ४६.८, पाटोदा ४३.८, लोखंडी सावरगाव ५३.३, घाटनांदूर ५१, बर्दापूर ३८.३, केज २७.५, युसुफ वडगाव ४९.८, हनुमंत पिंपळी ४०.८, होळ ५१.३, विडा ४१, नांदूरघाट ३०.३, धर्मापुरी २९, नागापूर ५१, सिरसाळा ५१, पिंपळगाव गाढे ४५.३, धारूर २६.८, मोहखेड ३८.३, तेलगाव ५८.३, शिरूर कासार ४९, रायमोहा ४३.५, तिंतरवणी ६१.३.

परळी-बीड मार्गावरील पूल वाहून गेल्याने वाहतूक खोळंबली

परळी वैजनाथ : तालुक्यातील पांगरी येथील वाण नदीवरील तात्पुरत्या स्वरूपाचा तयार करण्यात आलेला पूल वाहून गेल्याने परळी-महामार्ग बंद झाल्याने वाहतूक खोळंबली आहे. ऐन पावसाळ्यात कंत्राटदाराने काम सुरू केल्याने व चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. याशिवाय नाथरा येथील वाण नदीच्या पात्रावरील नाथरा-इंजेगाव मार्गावरील पुलाचे काम सध्या सुरू आहे. या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा पूल तयार करण्यात आला होता. पण शुक्रवारी वाण नदीला आलेल्या पुरात हाही पूल व भराव वाहून गेला आहे. यामुळे नाथऱ्याचा परळी व इतर गावाचा संपर्क तुटला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com