Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Khadimal Water Crisis : खडीमलच्या ग्रामस्थांचा जीव धोक्यात

Water Scarcity : यंदा चिखलदरा तालुक्यातील पाणीटंचाईची स्थिती अतिशय गंभीर दिसत आहे. खडीमल या गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Team Agrowon

Amaravati News : यंदा चिखलदरा तालुक्यातील पाणीटंचाईची स्थिती अतिशय गंभीर दिसत आहे. खडीमल या गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या या गावाला तीन ते चार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी प्रत्यक्षात टॅंकरची संख्या अधिक वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

यंदा चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून त्यामध्ये खडीमल या गावातील परिस्थिती अतिशय भीषण आहे. तेथे तीन ते चार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा आहे. पाण्यासाठी जिवाची पर्वा न करता रात्री-अपरात्री महिलांना भटकंती करावी लागत आहे.

त्यामुळे पाण्याच्या टॅंकरची संख्या वाढविण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. त्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी माधुरी बेठेकर, जयराम सावलकर, सीमा कासदेकर, सुगुणा धिकार, अलका कास्देकर, बीबी कासदेकर, श्याम सावलकर, सुनीता धिकार, मुंगीलाल धिकार, मुन्ना जामूनकर, सायक जामूनकर, विजय सावलकर, रामबा इसावलकर यांचा समावेश होता.

..तर जबाबदार कोण?

खडीमल या गावातील ग्रामस्थांकडून पाण्यासाठी आपला जीवसुद्धा धोक्यात टाकण्यात येत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यामध्ये केवळ पुरुषच नाही तर महिला आणि लहान मुलीसुद्धा आपला जीव धोक्यात घालून पाणी मिळविण्यासाठी आटापिटा करीत असल्याचे दिसून येत आहे.

हे दृश्य केवळ एक दिवसाचेच नाही तर दररोज जीवावर उदार होऊन नागरिकांना अशा प्रकारे पाणी मिळवावे लागत आहे. त्यामुळे एखादी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Rate: ऊसदरावर तोडगा नाही, पहिली उचल ४,५०० रुपये द्या, राजू शेट्टींची मागणी

Stress in Turmeric Crop: दुष्काळाचा हळद पिकाला फटका; फुटवे वाढवण्यासाठी आणि उत्पादन वाचवण्यासाठी काय कराल?

Sugar Workers Strike : कामगारांच्या हक्कासाठी 'सीटू' मैदानात; साखर कामगारांच्या संपाला बळ

Manual Sugarcane Harvesting: धाराशिवमध्ये ७० टक्के उसाची मजुरांमार्फत तोडणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Drought Crisis : दुष्काळाचा सामना करण्यासाठी पाण्याचे चोख नियोजन करा: एस. कार्तिकेयन

SCROLL FOR NEXT