Marathwada Water Crisis : मराठवाड्यातील ३७० गावे, १४९ वाड्यांना टंचाईच्या झळा

Water Scarcity : मराठवाड्यात एकीकडे पूर्व मोसमी पावसाचा जोर सुरू असताना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवरच अवलंबून राहण्याची वेळही कायम आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील ३७० गावे व १४९ वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. त्यासाठी ५७३ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

मराठवाड्यात एकीकडे पूर्व मोसमी पावसाचा जोर सुरू असताना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवरच अवलंबून राहण्याची वेळही कायम आहे. पाणीटंचाईची झळ सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात असून त्या पाठोपाठ बीड व नांदेड जिल्ह्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

Water Scarcity
Marathwada Water Storage : मराठवाड्यात उपयुक्त पाणीसाठा ३२ टक्क्यांवर

१३५९ विहिरींचे अधिग्रहण

मराठवाड्यातील पाणी टंचाईग्रस्त गावे व पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला पाणीपुरवठा करण्यासाठी १३५९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे यामध्ये टँकर साठी ३५५ तर टँकर किती रिक्त पाणीपुरवठ्यासाठी १००४ अधिकृत केलेल्या विहिरींचा समावेश आहे.

Water Scarcity
Marathwada Water Scarcity : मराठवाड्यात पाणीटंचाई गंभीर ; टँकरची संख्या ४३५ वर

टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या

जिल्हा गाव वाड्या

छ.सं.नगर ३२ ००

जालना २५ १०

परभणी ०४ ००

हिंगोली ०१ ०३

नांदेड ०७ २९

बीड ४६ ५८

लातूर ०२ ०२

धाराशिव १० ००

जिल्हानिहाय टँकरची संख्या

छत्रपती संभाजीनगर २७३

जालना १९०

परभणी ०७

हिंगोली ०२

नांदेड २५

बीड ५७

लातूर ०३

धाराशिव १६

जिल्हा निहाय अधिग्रहीत विहिरींची संख्या

छत्रपती संभाजीनगर १९१

जालना २५२

परभणी ४९

हिंगोली १०१

नांदेड ३३३

बीड १६२

लातूर १०९

धाराशिव १६२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com