Water Crisis : पावसाने सोडविला पाणीप्रश्‍न

Water Issue : अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई पूर्वमोसमी पावसाने मिटवली आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई पूर्वमोसमी पावसाने मिटवली आहे. मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने ९३ गावे आणि ५७२ वाड्या-वस्त्यांवर पाणी उपलब्ध झाल्याने तेथे टॅंकरने सुरू असलेला पाणी पुरवठा बंद झाला आहे. यामुळे ११३ टॅंकर बंद झाले आहेत. आता केवळ ६८ टॅंकर सुरू आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पाऊस झाला. परतीचा पाऊस पुरेसा झाला नसल्याने अनेक गावांत जानेवारीपासूनच पाणी टंचाई सुरू झाली होती. एप्रिलमध्ये तर तीव्र पाणीटंचाई होती. जिल्ह्यातील पठारी भाग आणि डोंगराळ भागात दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. विशेषतः संगमनेर, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत आणि अकोले तालुक्यांतील गावे-वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.

यावर्षी १६२ गावे आणि ९१९ वाड्या-वस्त्यांमधील ३ लाख ४२ हजार ४४ लोकसंख्येला १८१ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता पारनेर तालुक्यातील ३८ गावे आणि २९४ वाड्या-वस्त्यांमधील ८१ हजार ८०३ लोकांना ३९ टँकरने, पाथर्डी तालुक्यातील ३६ गावे आणि २०९ वाड्यांमधील ९४ हजार ५१४ लोकांना ५४ टँकरने, संगमनेर तालुक्यातील २६ गावे आणि ६३ वाड्या-वस्त्यांमधील ३६ हजार ४५१ लोकांना २० टँकरने पाणीपुरवठा केला जात होता.

Water Crisis
Water Crisis : पंधरा दिवसांआड मिळते २० मिनिटे पाणी

ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी नेहमीच वणवण सुरू होती. यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात जोरदार अवकाळी आणि पूर्वमोसमी पाऊस झाला. दरवर्षीच्या तुलनेत साधारण पंचवीस दिवस आधीच जोरदार पाऊस झाला असल्याने गाव तलाव, पाझर तलाव, ओढे, नाले, नद्यांना पाणी आले. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे स्त्रोत भरले.

पाणी उपलब्ध झाले आणि पाणी योजनाही सुरू झाल्या. यामुळे टॅंकरच्या पाण्याची गरज बंद झाली. त्यामुळे ९३ गावे ५७२ वाड्या-वस्त्यांसाठीचे ११३ टँकर बंद झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात पाणीप्रश्‍न सुटल्याने कोट्यवधी रुपयांचा टँकरवरील खर्च वाचला आहे. बंधारे, पाझर तलाव पाण्याने भरले आहेत. या तलावाच्या परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना पाणी आले आहे.

Water Crisis
Marathwada Water Crisis : मराठवाड्यातील ३७० गावे, १४९ वाड्यांना टंचाईच्या झळा

त्यामुळे ९३ गावे आणि ५७२ वाड्या-वस्त्यांचा पाणीप्रश्‍न सुटला आहे. अकोले, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड हे चार तालुके आणि पारनेर नगरपालिका हद्दीतील २६ गावे आणि १६० वाड्या-वस्त्यांची पाणीटंचाई दूर झाली आहे.

चार तालुके आणि जिल्ह्यातील एकमेव पारनेर नगरपालिका हद्दीतील ३१ वाड्या-वस्त्या टँकरमुक्त झाल्या आहेत. सध्या केवळ ६८ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मागील वर्षी २०२४ मध्ये २९ मे रोजी ३२२ गावे आणि १ हजार ७०५ वाड्या-वस्त्यांमधील ६ लाख १७ हजार ४६३ लोकसंख्येला ३३१ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता.

तालुकानिहाय टँकरमुक्त गावे (कंसात वाड्या-वस्त्यांची संख्या) संगमनेर-४ (६), अकोले- ३ (२५), नेवासे- २ (२५), नगर-१० (४४), पारनेर-३३ (२३३), पाथर्डी- १६ (८६), शेवगाव-२ (१८), कर्जत-१६ (१०४), जामखेड-६, श्रीगोंदे- १.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com