CITU Support : नाशिक राज्यातील साखर कारखाना कामगारांनी विविध न्याय्य मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या (सीटू) महाराष्ट्र राज्य समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. साखर कामगारांचे थकीत वेतन तातडीने अदा करावे, कंत्राटी व रोजंदारी कामगारांना न्याय द्यावा आणि कामगारांचे कायदेशीर हक्क व रोजगाराची सुरक्षितता कायम ठेवावी, अशी मागणी ‘सीटू’ने केली आहे.