Water Tanker Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : पुरंदरच्या पिसे गावाला अजूनही पाणीटंचाईचा फटका ; होतोय टँकरने पाणीपुरवठा

Water Crisis : पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यामुळे सध्या टंचाई सुरू झालेली नाही. मात्र पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात पिसे गावात पाणीटंचाईची झळ अजूनही कायम आहे.

Team Agrowon

Pune News : पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यामुळे सध्या टंचाई सुरू झालेली नाही. मात्र पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात पिसे गावात पाणीटंचाईची झळ अजूनही कायम आहे. या गावात एक टँकरने ६३१ नागरिकांना पाणी पुरवठा सुरू आहे.

मागील जवळपास दोन वर्षांपासून या गावातील नागरिकांना पाणीपुरवठा असल्याने प्रशासनाने या गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

चालू वर्षी मॉन्सूनचे वेळेवर आगमन झाले होते. मात्र अधूनमधून पडत असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे १०० टक्के भरली होती. परंतु परतीचा पाऊसही समाधानकारक झाला नाही.

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे या भागात सर्व भिस्त टँकरवर अवलंबून होती. पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. प्रामुख्याने पुरंदरमधील रिसे पिसे या गावात पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. आता मात्र पाणीटंचाईची समस्या अधिक निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

गेल्या वर्षी अति अल्प पर्जन्यमान झाले होते. शासनाकडून दुष्काळ जाहीर केला होता. केंद्रस्तरीय समितीने दुष्काळाची दाहकताही तपासली; मात्र त्यावर उपाययोजना केल्या नाहीत. छावण्या चालू कराव्यात, विविध गावांना पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, तालुक्यातील बंद योजना त्वरित चालू करावे.

आदी मागण्या नागरिकांनी शासनाकडे केल्या होत्या. मात्र संबंधित प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली नव्हती. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अनेक गावांत, वाड्या- वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता.

काही गावांतील टँकर पावसाळा सुरू झाल्यानंतर बंद केले. मात्र पिसे गावाच्या परिसरात कमी पाऊस झाल्यामुळे भूजल पातळीत फारशी वाढ झालेली नसल्याने ऐन पावसाळ्यात टँकर सुरू असल्याने अद्यापही दुष्काळाची दाहकता कमी झालेली नाही.

गेल्या वर्षी विभागात १३९ टँकर पुरवठा :

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई सुरू झालेली होती. परंतु चालू पाणीटंचाई नसली तरी अवघ्या एकच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी विभागातील १३८ गावे व ७२५ वाड्या वस्त्यांवर १३९ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता.

यामध्ये पुणे जिल्ह्यातील दहा गावे व ६१ वाड्यावस्त्यांवर १२ टँकर, साताऱ्यातील ८० गावे २९१ वाड्या वस्त्यांवर ८० टँकर, सांगलीतील ४४ गावे व ३३८ वाड्या वस्त्यांवर ४३ टँकर, सोलापुरातील ४ गावे ३५ वाड्यावस्त्यांवर ४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. तर कोल्हापूरात पाणीटंचाई नव्हती.

गावात दरवर्षी कमी पाऊस पडतो. मागील दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पावसाळ्यात पावसावर काही प्रमाणात पिके घेतली होती. परंतु आता पाणीटंचाई सुरू झाली आहे. गावात शासकीय विहीर नसल्याने गावाच्या आडामध्ये टँकरचे पाणी टाकून त्याचा गावाला पाणीपुरवठा केला जातो.
रोहन मुळीक, सरपंच, पिसे, सासवड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT