Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : मराठवाड्यात पाण्याचे संकट ; आठ प्रकल्प कोरडे

Water Crisis : मराठवाड्यातील एकूण ७५१ लघु प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प कोरडे पडले आहेत.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील एकूण ७५१ लघु प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प कोरडे पडले आहेत. दुसरीकडे ७२ लघु व ३ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. पाणीसाठा जोत्याखाली गेलेल्या तीन मध्यम प्रकल्पात धाराशिवमधील दोन व जालन्यातील एका प्रकल्पाचा समावेश आहे. कोरड्या पडलेल्या लघु प्रकल्पात हिंगोलीतील ३, बीड, लातूर, धाराशिवमधील प्रत्येकी एक व जालन्यातील २ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.

जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या ७२ लघु प्रकल्पात धाराशिवमधील सर्वाधिक २३, बीड मधील १६, जालन्यातील १३, नांदेड मधील ९, हिंगोलीतील ५, परभणीतील ४ व लातूर मधील २ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. २११ लघु प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी, २४५ प्रकल्पात २५ ते ५० टक्के ,१४८ प्रकल्प ५० ते ७५ टक्के तर केवळ ६७ लघु प्रकल्पात तर टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे.

७५ टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा असलेल्या लघु प्रकल्पांची संख्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ५५ आहे. त्यापाठोपाठ धाराशिवमधील ६, लातूरमधील दोन तर जालना, बीड, नांदेड, परभणी या जिल्ह्यातील प्रत्येकी एका लघु प्रकल्पात ७५% पेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

७५ माध्यम प्रकल्पांपैकी दहा प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी तर २९ प्रकल्पात २५ ते ५० टक्के २२ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के टक्केवारी ११ मध्यम प्रकल्पात ७५ टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये सर्वाधिक १० मध्यम प्रकल्प छत्रपती संभाजीनगर मधील तर एक प्रकल्प बीडमधील,असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

उपयुक्त पाणीसाठा ४८ टक्क्यांवर

मराठवाड्यातील ८७९ मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ४८.७७ टक्क्यांवर आला आहे. यामध्ये ७५ माध्यम प्रकल्पांमध्ये असलेल्या ४४ टक्के उपयुक्त पाणीसाठयासह ७५१ लघु प्रकल्पातील केवळ ३२ टक्के उपयुक्त पाणी साठ्याचा समावेश आहे.

२२ लघु प्रकल्पात केवळ २ टक्के उपयुक्त पाणी

परभणी जिल्ह्यातील २२ लघु प्रकल्पात केवळ दोन टक्के उपलब्ध पाणी साठा शिल्लक आहे. हिंगोली जिल्ह्यातील २७ लघु प्रकल्पात १९ टक्के, नांदेड मधील ८० प्रकल्पात ३५ टक्के ,धाराशिव मधील २०६ प्रकल्पात ३४ टक्के, लातूर मधील १३५ प्रकल्पात ४३ टक्के,बीड मधील १२६ प्रकल्पात २७ टक्के,जालन्यातील ५७ प्रकल्प २८ टक्के तर छत्रपती संभाजीनगर मधील ९८ लघु प्रकल्प २५ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Regulations: ट्रॅक्टरधारकांपुढील नवी आव्हाने

Turmeric Market: वायदेबंदीची अवास्तव मागणी

Agricultural Rain Damage: एक लाख २४ हजार हेक्टरवरील पिके बाधित

Rain Crop Damage: मराठवाड्यात ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

Ahupe Village Rehabilitation: ‘आहुपे’च्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा

SCROLL FOR NEXT