Palkhi Sohala 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Palakhi Sohala 2024 : पालखी सोहळ्यात जलसंवर्धन दिंडी

Water Conservation : गेल्या २० वर्षांपासून पुणे विद्यापीठ दिंडीची परंपरा सुरू आहे. जलसंवर्धन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचे महत्त्व समाजात पसरवणे हा हेतू आहे.

Team Agrowon

Pune News : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने याावर्षीही व तंत्रशिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी’ ‘निर्मल वारी-हरित वारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अंतर्गत जलसंवर्धन दिंडीचे आयोजन ३० जून ते १७ जुलै या दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर करण्यात येणार आहे. गेल्या २० वर्षांपासून पुणे विद्यापीठ दिंडीची परंपरा सुरू आहे. जलसंवर्धन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचे महत्त्व समाजात पसरवणे हा हेतू आहे.

त्यासोबतच लोकशाही बळकट करण्यासाठी जनजागृती, लोकसंख्या नियंत्रण, जनजागृती व अन्य उपक्रम दिंडीमध्ये आयोजित केले जाणार आहे. या उपक्रमात विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील आणि राज्यभरातील विद्यापीठांमधून स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत.

या दिंडीसाठी निवड झालेल्या विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी ३० जून रोजी दुपारी १ वाजेपर्यंत विद्यापीठात उपस्थित राहणे आवश्यक आहे. या दिंडीत सहभागी होणाऱ्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची कर्तव्य रजा मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warana Dairy: वारणा दूध संघातर्फे स्तनदाह प्रतिबंधक पशू खाद्याचे वितरण

Sangli Water Storage: सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत ६७ टक्के पाणीसाठा

Maize Cultivation: मका पिकाची ६० टक्के क्षेत्रांवर लागवड

Banana Farming: केळी कंदांचा खानदेशामध्ये तुटवडा

Reshim Sheti: गुणवत्तापूर्ण चॉकी निर्मितीसाठी निर्जंतुकीकरणावर भर

SCROLL FOR NEXT