Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Fertilizer Selling : बोगस बियाणे, खत विक्री करणाऱ्यांवर ‘वॉच’

Rice Sowing : भात पेरणीच्या पार्श्‍वभूमीवर वेगवेगळ्या दुकानांमध्ये विक्रीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आठ हजार ९४० क्‍विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, युरिया १ हजार ९२० टन व मिश्र खत १०६ टन इतका पुरवठा करण्यात आला आहे.

Team Agrowon

Raigad News : भात पेरणीच्या पार्श्‍वभूमीवर वेगवेगळ्या दुकानांमध्ये विक्रीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आठ हजार ९४० क्‍विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, युरिया १ हजार ९२० टन व मिश्र खत १०६ टन इतका पुरवठा करण्यात आला आहे.

मात्र बोगस बियाणे, खत विक्री करणाऱ्यांवर तालुका स्तरावर गुण नियंत्रण निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांची विक्रेत्यांवर नजर राहणार आहे.

यंदा पाऊस उशिराने दहा तारखेनंतर पडण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला आहे. शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागून राहिले आहे. पेरणीसाठी बियाण्यांसह खतांचा पुरवठा वेळेवर उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने बियाणे व खतांचे वितरण तालुका स्तरावरून वेगवेगळ्या दुकानांमध्ये केले आहे.

जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत १७ हजार ४५० क्‍विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. त्‍यानुसार सुमारे १६ हजार ५०० क्‍विंटल बियाणे प्राप्त झाले असून १९६ भात बियाण्यांच्या दुकानांमध्ये दहा दिवसांपूर्वीच ते विक्रीस उपलब्ध झाले आहे.

आतापर्यंत आठ हजार ९४० क्‍विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी दुकानांमध्ये वाढू लागली आहे. त्‍यांची फसवणूक होऊ नये, यासाठी तालुका स्तरावर गुण नियंत्रण निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या निरीक्षकांमार्फत बियाणांचे नमुने तपासणे, प्रयोगशाळेत नमुने पाठविणे. त्यानंतर विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे.

‘आधुनिक पद्धतीने भातलागवड करावी’

मुरूड : तालुक्यात कृषी सेवा केंद्रावर भाताच्या रूपाली, जया, सुवर्णा, चिंटू, वायएसआर, शुभांगी आदी भात बियाण्यांच्या सुधारित जाती विक्रीसाठी उपलब्ध असून शेतकऱ्यांनी लागवडीसाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब करून उत्‍पादकता वाढवावी, असे आवाहन मुरूड तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ आहिरे यांनी शेतकरऱ्यांना केले आहे.

मुरूड तालुक्यात ३३०० हेक्टर भात क्षेत्र असले तरी पेरणी योग्य क्षेत्र ३२०१ हेक्टर आहे. २०२२ मध्ये सरासरी २४०१ मिमी पावसाची नोंद झाली असून भाताची उत्पादकता हेक्टरी २०७८ किलोग्रॅम, तर २०२३ मध्ये ३२०१ इतकी अपेक्षित आहे. खरीप हंगामातील नाचणी पीक मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

कृषी सेवा केंद्रावर विक्रीसाठी आलेल्या बियाणे, कीटकनाशके आणि खते यांचे प्रतिनिधिक स्वरूपात नमुने गोळा करून ते परीक्षणासाठी म्हणजेच त्याची उगवणक्षमता, शुद्धता आणि गुणवत्ता तपासण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT