Plastic Waste Agrowon
ॲग्रो विशेष

Waste Management : गावातच होतेय कचऱ्याचे व्यवस्थापन

Waste Water Management : केंद्र सरकारच्या स्वच्छता व पेयजल विभागाकडून देशात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दोनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Team Agrowon

Nashik News : केंद्र सरकारच्या स्वच्छता व पेयजल विभागाकडून देशात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दोनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालये, शाळा आणि अंगणवाड्यांना शौचालये याला प्राधान्य देण्यात आले. याची उद्दिष्टपूर्ती झाल्यावर आता दुसऱ्या टप्प्यात गावातील सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात येत असून, गावातील सांडपाण्याचे व घनकचऱ्याचे गावपातळीवरच व्यवस्थापन करण्यात येत आहे.

गावातील प्रमुख समस्या असणाऱ्या घनकचऱ्याचे वर्गीकरण करून गावातच त्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती होईल. यात जिल्ह्यातील सर्व एक हजार ३८४ ग्रामपंचायती सहभागी असून, आतापर्यंत ७५४ गावांत कामे पूर्ण झाली आहेत.

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सर्व महसुली गावांमध्ये काम करण्यात येत असून, गावांना निधी देण्यात येत आहे.

जिल्ह्यात एक हजार ९१० महसुली गावे आहेत. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनात जिल्ह्यातील सर्व १९१० गावे सहभागी असून, आतापर्यंत ७५४ गावांमध्ये सांडपाणी व घनकचऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित कामेही सुरू आहेत. ही कामे लवकर पूर्ण होतील. त्यासाठी बैठक घेण्यात आल्याचे पाणी स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक दीपक पाटील यांनी सांगितले.

गावात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्यासाठी ठिकठिकाणी कंपोस्ट खड्डे तयार करण्यात येत असून, यापासून भविष्यात गावांना उत्पन्नही मिळेल. हे कंपोस्ट खत शेतीसाठी अतिशय उपयुक्त ठरणार असून, एकीकडे कचऱ्याची विल्हेवाट, दुसरीकडे खतनिर्मिती असे दुहेरी हेतू यातून साध्य होणार आहेत.

कचरा व्यवस्थापनात ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करावयाचा असून, या कचऱ्यातील प्लॅस्टिक आणि धातू वेगळे करावयाचे आहेत. यासाठी गावपातळीवर कचरा विलगीकरण शेड बांधण्यात येत आहे.

ज्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण होणार असून, विक्रीयोग्य कचऱ्याची विक्री करता येईल. तसेच, गावात ठिकठिकाणी ओला व सुका कचऱ्यासाठी सार्वजनिक कचराकुंड्या बसविण्यात आल्या आहेत. कचरा वाहतुकीसाठी तीनचाकी सायकली घेण्यात येत असून, त्याद्वारे कचरा जमा करण्यात येत आहे.

घनकचरा व्यवस्थापनातील कामे

सार्वजनिक स्तरावर कंपोस्ट खतखड्डे (नॅडेप), सार्वजनिक कचराकुंड्या, तीनचाकी सायकली, प्लॅस्टिक शेड, कचरा वर्गीकरण शेड.

सांडपाणी व्यवस्थापनातील कामे

सार्वजनिक व वैयक्तिक स्तरावर शोषखड्डे, पाझरखड्डे.

तालुकानिहाय सुरू असलेली कामे

तालुका सहभागी ग्रामपंचायती पूर्ण झालेली कामे

बागलाण १३१ ९०

चांदवड ९० ३८

देवळा ४२ १९

दिंडोरी १२१ ६४

इगतपुरी ९६ ३१

कळवण ८६ ७५

मालेगाव १२५ ३५

नांदगाव ८८ २५

नाशिक ६६ ३०

निफाड ११८ ४६

पेठ ७३ ४३

सिन्नर ११४ ५१

सुरगाणा ६१ १००

त्र्यंबकेश्वर ८४ ५६

येवला ८९ ५१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT