Water Issue  Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Issue : ...तर महामंडळाच्या कार्यालयाला टाळे लावू

Marathwada News : मराठवाड्याच्या न्याय हक्काचे पाणी जायकवाडीत वेळेत नाही सोडल्यास, गोदावरी महामंडळाच्या कार्यालयाला टाळे लावू, असा इशारा मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी दिला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्याच्या न्याय हक्काचे पाणी जायकवाडीत वेळेत नाही सोडल्यास, गोदावरी महामंडळाच्या कार्यालयाला टाळे लावू, असा इशारा मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी दिला. मराठवाडा पाणी परिषदेच्या नेतृत्वात विभागीय आयुक्तालयासमोर शुक्रवारी (ता. १३) समन्यायी पाणीवाटपाच्या प्रश्‍नावर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

मराठवाड्यात नांदेड वगळता इतर एकाही जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणेही भरलेली नाहीत. पाणीसाठांची स्थिती मराठवाड्यातील रब्बी उत्पादक शेतकऱ्यांची तसेच पिण्याच्या पाण्याबाबत चिंता वाढवणारी आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव वर्षात तरी शासनाने सिंचन अनुशेष निवारणाचा कालबद्ध कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित करणे अपेक्षित होते, परंतु प्रत्यक्षात तसे घडले नसल्याचा आरोप मराठवाडा पाणी परिषदेने केला आहे.

मराठवाड्यात आज घडीला सिंचन क्षेत्र फक्त १८ ते २० टक्के आहे. रंगनाथन समितीच्या अहवालानुसार ७० टक्के भाग हा कायम दुष्काळी आहे. या तुटीच्या विभागामध्ये अंतर खोरे पाणीवहन अंतर्गत २३ ऑगस्ट २०१९ ला १६८ टीएमसी पाणी गोदावरी नदीत वळविण्याचे ठरले होते. या कामाची गती अत्यंत संथ आहे. त्यामुळे या पिढीला तरी हे पाणी मिळेल असे वाटत नाही, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी लाक्षणिक उपोषणात मराठवाड्यातील विविध गावचे सरपंच, यांच्यासह पाणी विषयावर काम करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी, आमदार प्रशांत बंब, आमदार हरिभाऊ बागडे, माजी आमदार कल्याण काळे, प्रवीण घुगे, मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे, सिंचन आयोगाचे माजी सदस्य सर्जेराव ठोंबरे, जलतज्ज्ञ डॉ. शंकरराव नागरे, इंजिनियर जयसिंग हिरे, फळबाग तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे, महेश निनाळे, पंडित शिंदे, रमेश गायकवाड, माजी मंत्री अनिल पटेल, प्रा. शिवाजी हुसे, पंडित शिंदे आदींनी सहभागी होऊन मनोगत व्यक्त केले.

उपोषणास संपूर्ण मराठवाड्यातून शेतकरी, महिला, उद्योजक, प्राध्यापक, शिक्षक, वकील, महाविद्यालय युवक, यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास मराठवाडा जनता विकास परिषद छत्रपती संभाजीनगर, सी एस एन, मराठवाडा विकास युवक मंडळ, मराठवाडा मुक्ती मोर्चा, महाकेशर - आंबा बागायतदार संघ, सर्व राजकीय पक्ष, सर्व शेतकरी संघटना आणि मराठवाड्यातील शंभर ग्रामपंचायत यांनी पाठिंबा दिला.

या आहेत मागण्या

 समन्याय पाणीवाटप नियमानुसार जायकवाडीत त्वरित पाणी सोडा

 अंतर खोरे पाणी वहन अंतर्गत १६८ टीएमसी पाणी गोदावरी नदीत वळवा

 कृष्णा- मराठवाडा योजनेच्या कामास गती द्या

 विदर्भातील वैनगंगा-प्राणहिता नदी खोऱ्यातील अतिरिक्त पाणी येलदरी धरणात वळवा

 मराठवाड्यातील पूर्ण प्रकल्प त्वरित पूर्ण करा

 दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम घोषित करा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT