E-Office System Agrowon
ॲग्रो विशेष

E-Office System In Wardha : ई-ऑफिस प्रणालीत राज्यात वर्धा जिल्हा पहिला

राज्य शासनाच्या महाआयटी या कंपनीद्वारे ही प्रणाली राबविण्यास काही वर्षांपासून प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात केवळ मंत्रालयात या प्रणालीचा अवलंब केला जात होता.

Team Agrowon

Wardha News : सर्वसामान्य नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासोबत शासकीय कामकाज (Government Office Work) अधिक स्मार्ट व गतिमान होण्यासाठी राज्यात ई-ऑफिस प्रणाली राबविली जात आहे. या प्रणालीचा तालुकास्तरावर अवलंब करणारा वर्धा हा राज्यात पहिला जिल्हा ठरला आहे.

राज्य शासनाच्या महाआयटी या कंपनीद्वारे ही प्रणाली राबविण्यास काही वर्षांपासून प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात केवळ मंत्रालयात या प्रणालीचा अवलंब केला जात होता. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये ई-ऑफिस प्रणालीने जोडली गेली.

सर्वस्तरावरील शासकीय कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे करण्याचे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी वर्धा येथे रुजू झाल्यानंतर तीनही उपविभागीय कार्यालयांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित केली.

पहिल्या टप्प्यात आर्वी उपविभागातील आर्वी, कारंजा व आष्टी या तालुक्यात प्रणाली कार्यान्वित झाली आहे.सर्वसामान्य नागरिकांची कामे गतीने निकाली निघावी यासाठी ही प्रणाली उपयोगी ठरली आहे.

आर्वी ठरला पहिला तालुका

जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी कार्यालयानंतर तहसिल कार्यालये ई-ऑफिस करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आर्वी उपविभागातून सुरुवात करण्यात आली. या विभागातील आर्वी तालुक्याने ई-ऑफिसला प्रारंभ केला.

राज्यात हा तालुका या प्रणालीचा वापर करणारा पहिलाच तालुका ठरला आहे. त्यानंतर कारंजा व आष्टी तालुक्याने देखील ई-ऑफिसला प्रारंभ केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT