Officer Demand Money: विहीर मंजूरीसाठी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी; सरपंचाने केली नोटांची उधळण

विहिरी मंजूरीसाठी अधिकारी शेतकऱ्यांना पैसे मागत आहेत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी सरपंच साबळे यांच्याकडे केली होती.
Vihir Subsidy Fulambri
Vihir Subsidy Fulambri Agrowon

छत्रपती संभाजीनगर - विहीर मंजूर करण्यासाठी बीडीओ अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना पैसे मागितल्यामुळे संतप्त सरपंचाने पंचायत समिती कार्यालयासमोर नोटा उधळत आंदोलन केल्याची घटना फुलंब्री तालुक्यात शुक्रवारी (ता.३१) घडली.

गेवराई पैधा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी गळ्यात दोन लाख रुपयांच्या नोटांची माळ घालून पंचायत समिती बीडीओचा निषेध केला.

तसेच पंचायत समिती कार्यालयासमोर नोटा उधळण केली. साम टीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

विहिरी मंजूरीसाठी अधिकारी शेतकऱ्यांना पैसे मागत आहेत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी सरपंच साबळे यांच्याकडे केली होती. याच घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

"मी अपक्ष सरपंच झालो आहे. मी निवडणुकीत पैसे वाटले नाहीत, विहीर मंजूरीसाठी शेतकऱ्यांना कुठल्या तोंडांनी पैसे मागू.

तुम्ही जर एखाद्या सभापतीचं, एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल तर मायबापाहो गरिबांचं काम कोण करणार? गरिबाला कोण वाली आहे?" असा प्रश्न साबळे यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारच्या विहीर अनुदान योजने अंतर्गत गेवराई पैधा गावाचे शेतकऱ्यांनी पंचायत समिती बीडीओकडे विहीर मंजूरीसाठी अर्ज केला होता.

परंतु बीडीओने विहीर मंजूरीसाठी पैशाची मागणी केल्याचा आरोप सरपंच साबळे यांनी केला.

Vihir Subsidy Fulambri
Irrigation Protest in Igatpuri : जमिनीच्या मोबदल्यासाठी जलसमाधीचा इशारा

त्यामुळे सरपंचाने थेट पंचायत समितीचे कार्यालय गाठले. २ लाख रक्कमेच्या नोटांची माळ त्यांनी गळ्यात अडकून बिडिओच्या गैरकृत्याचा पाढा वाचत नोटांची उधळण केली. यावेळी साबळे यांनी बिडिओने विहीर मंजूरीसाठी पैसे मागितल्याचा आरोप केला.

"दहा-दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांकडून जमा करून दोन लाख रुपये मी घेऊन आलो आहे. या पंचायत समितीच्या बिडिओला आम्ही हे पैसे देतोयत.

पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी (Well) मंजूर करून द्या. जर तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही. लाचलुपत प्रतिबंधक अधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर भीक मागू.

आम्ही शेतकरी तिथे जाऊन त्यांच्या कार्यालयासमोर नागडं बसू. अजून भीक मागून पैसे आणून तुम्हाला देऊ." अशा अत्यंत संतप्त प्रतिक्रिया साबळे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर दिल्या.

बीडीओने आमच्या विहिर मंजूर केली नाहीतर आम्ही विभागीय आयुक्तालयात जाऊन ४ लाख रुपये नोटांची इशाराही सरपंच साबळे यांनी यावेळी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com