Water Update Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : पुनद-चणकापूरच्या आवर्तनाची प्रतीक्षाच

Team Agrowon

Nashik News : शहरासह मालेगाव उपविभागात वाढत्या तापमानामुळे पिण्याचे पाणी व चाराटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. मोसम खोऱ्यापाठोपाठ गिरणा खोऱ्यालाही टंचाईला सामोरे जावे लागते. गाव व परिसरातील विहिरी आटल्याने नदीकाठच्या गावांनाही पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे.

तालुक्यात ४९ गावे व ९७ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.दोन लाखांहून अधिक नागरिकांची तहान टैंकरने मागत आहे. पशुधनाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने पाणीटंचाई निवारणासाठी पुनद व चणकापूरचे अखेरचे आवर्तन गिरणा नदीपात्रातून सोडावे, अशी मागणी नदीकाठच्या ग्रामस्थांनी केली आहे.

नदीकाठच्या पाणीपुरवठा योजना कोरड्या पडल्यानंतर गेल्या आठवड्यात गिरणा डाव्य कालव्याद्वारे पाटबंधारे विभागाने पाणी सोडले होते. या पाण्याने बारागाव पाणीपुरवठा योजनेचा तलाव व शहर पाणीपुरवठ्याचा तळवाडे साठवण तलाव भरुन पाणीप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला. तथापि, बहुसंख्य गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी नदीकाठावर असून या विहिरी कोरड्याठाक पडत्याने नदीपात्रातून आवर्तन सोडावे.

पाटबंधारे विभागाने अखेरचे आवर्तन सोडल्यास पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पशुधनाच्या पाण्याची सोय होईल, असे मत व्यक्त करतांनाच यावेळी समाधानकारक व १५ जूननंतर पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने अखेरचे आवर्तन सोडावे, अशी मागणी दाभाडी येथील प्रगतशील शेतकरी अरुण देवरे यांनी केली आहे.

पुनंदमध्ये अद्यापही ३८ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणी सोडण्यास फारशी अडचण येणार नाही. गिरणा नदीकाठच्या बहुसंख्य गावांनी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन आवर्तन सोडण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे. उन्हाची तीव्रता कायम असत्याने पशुधनाला नेहमीपेक्षा जास्त पाण्याची गरज भासत आहे. गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरपासूनच परिसर पाणीटंचाईचा सामना करत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता व अन्य बाबींमुळे नागरीकांनी ही मागणी केली नाही.

धरणातील पाणीसाठ्याची स्थिती अशी धरण संकल्पित पाणीसाठा उपयुक्त पाणीसाठा (दशलक्ष घनफूट) पाणीसाठा

(टक्के)

चणकापूर २,४२७ ११८ ४.८६

हरणबारी १,१६६ ९४ ८.६

केळझर ५७२ ६ १.५

पुनंद १,३०६ ४९७ ३८.६

गिरणा १८,५०० ३,८०७ २०.५८

माळमाथ्यावरील पाणीप्रश्न बिकट

प्रशासनही निवडणूक प्रक्रियेत गुंतल्याने त्यांना पाणीटंचाईचे गांभीर्य जाणवत नव्हते. आता निवडणुका पार पडल्याने टंचाईकडे लक्ष देऊन आवर्तन सोडावे. गाव, वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय होत असली,तरी वापरासाठीचे पाणी व पशुधनाच्या पाण्यासाठी भटकंती किंवा टँकरद्वारे पाणी मागवावे लागत आहे. माळमाथा, काटवन, जिराईती यासह गिरणा व मोसम या दोन्ही खोऱ्यांना टंचाई जाणवते आहे. माळमाथ्यावरील पाणीप्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT