Parbhani News : परभणी जिल्ह्यातील तापमान ४५ अंश सेल्सिअसवर गेले आहे. प्रखर उन्हामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शुक्रवार (ता. २४) पर्यंत ३० हजार ११५ लोकसंख्येसाठी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिंतूर, गंगाखेड, सोनपेठ या ३ तालुक्यांतील १२ गावे आणि ७ वाड्या, तांड्यावर १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आठ तालुक्यांतील ११३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. शनिवारी (ता. २५) यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक म्हणजे ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद परभणी येथे झाली. वाढलेल्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. तसेच उपसा सुरू असल्याने अनेक ठिकाणचे जलस्रोत कोरडे पडले आहेत. परिणामी, नागरिकांसह जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
अनेक ग्रामपंचायतींच्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी आटल्या आहेत. मे महिन्याच्या मध्यापासून पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे झाले आहे. जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड, पालम या तालुक्यांतील डोंगराळ भागातील नागरिकांना इतर तालुक्यांच्या तुलनेत पाणी टंचाईच्या अधिक झळा सोसाव्या लागत आहेत. जिंतूर तालुक्यातील १० गावे व १ तांडा, गंगाखेड तालुक्यातील १ गाव आणि ५ वाडी-तांडे, सोनपेठ तालुक्यातील १ गाव आणि १ तांडा असे मिळून जिल्ह्यातील एकूण १९ लोकवस्त्यांना १७ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या ८ तालुक्यांतील १३३ गावांतील विहिंरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यात १७ विहिरी टँकरसाठी, तर ११६ विहिरी टँकर व्यतिरिक्त आहेत.
विहिरी अधिग्रहण केलेली गावे, वाड्या, वस्त्या कंसात एकूण विहिरींची संख्या :
परभणी तालुका ः दैठणा, पिंगळी कोथाळा (२). जिंतूर तालुका ः वरुड नृसिंह, राजेगाव, गारखेडा, ब्राह्मणगाव, वाघी धानोरा, कोरवाडी, मोहाडी, सावरगाव, सावरगाव तांडा, चारठाणा, भोसी, हनवतखेडा, बोरी, ताठापूर, जांभरून, पिंपळगाव काजळे तांडा, वझर बुद्रुक, नागठाणा, नांदगाव दुधना, बामणी, वडाळी, चांदज, वडी, कौसडी, जोगवाडा, बलसा, कोठा (४८). सेलू तालुका ः कुंडी, सोनवटी, ब्राह्मणगाव, शिंदे टाकळी, आहेर बोरगाव, पारडी, वालूर, केमापूर (८). मानवत तालुका ः सावरगाव खुर्द, वझुर खुर्द, रत्नापूर (३). सोनपेठ तालुका ः बोंदरगाव, वाघलगाव, निमगाव, खपाट पिंपरी, तिवठाणा, वैतागवाडी, बुक्तरवाडी, उखळी बुद्रुक, गवळी पिंपरी, कोठाळा, उखळी, डिघौळ, डिघोळ ई., वडगाव अंतर्गंत मरगळवाडी, पारधवाडी अंतर्गत लोकरवाडी, उंदरवाडी, नखातवाडी,
पोहंडुळ तांडा, हनुमाननगर तांडा, बंजारावाडी, माणिकनगर तांडा, डिखोळ रेवा तांडा (२३). गंगाखेड तालुका ः ढेबेवाडी, मानकादेवी, बोर्डा, उखळी, लिंबेवाडी, डोंगरगाव, शेंडगा, बडवणी, वाघदरा, गौलवाडी, धनगरमोहा, सुरळवाडी, घटांग्रा, कातकरवाडी, पिंपळदरी, कुंडगीरवाडी, इळेगाव, डोंगरजवळा, रुमना, मसनेरवाडी, निळा नाईक तांडा, मसनेरवाडी, गोदावरी तांडा, चिलगरवाडी, बोथी, उंबरवाडी, डुमनरवाडी, आरबुजवाडी, दगडवाडी, मरसडसगाव, वाघदरा तांडा, पोखर्णी तांडा, बोर्डा हनुमाननगर तांडा, बोर्डा उमलानाईक तांडा, मरगळवाडी, कर्लेवाडी, बोथी तांडा, उंबरवाडी तांडा, थावरुनाईक तांडा, खंडाळी तांडा (४३). पालम तालुका ः तांबुळगाव, पेंडू बुद्रुक, बनवस, नरटवाडी, लोभनाईक तांडा (५). पूर्णा तालुका ः धोतरा (१).
टँकर सुरू असलेली गावे, वाड्या, तांडे कंसात संख्या
जिंतूर तालुका ः ब्राह्मणगाव, मोहाडी, वाघी धानोरा, कोरवाडी, सावरगाव, सावरगाव तांडा, चाराठाणा, भोसी, हतवतखेडा, बोरी, शिवाची वाडी (११). सोनपेठ तालुका ः उखळी, माणिकनगर तांडा (२). गंगाखेड तालुका ः मसनेरवाडी, पोखर्णी तांडा, हनुमाननगर तांडा, घटांग्रा तांडा, गारमळ तांडा, लोभनाईक तांडा (४).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.