Amravati News: अमरावती जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांकडून तब्बल ९१ हजार ९९६ जणांनी कर्ज घेतले असून सुमारे १३० कोटी रुपयांचे वितरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये बँकांकडून कर्ज नाकारण्यात आलेले अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच बिगरशेती गरजांसाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे..अवैध सावकारी ही शेतकरी आत्महत्यांमागील प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे स्पष्ट होत असतानाच, सहकार विभागाने जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान १३८ ठिकाणी धाडी घालून कारवाई केली. यामध्ये २४ सावकारांवर थेट धाडी टाकण्यात आल्या असून मोर्शी येथील दोन महिला सावकारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत..Farmer Loan : सावकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी; चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना.एका सावकाराचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण ६७७ सावकार नोंदणीकृत होते. यापैकी चालू वर्षात ४९८ सावकारांनी परवाना नूतनीकरण केले आहे. सावकारी अधिनियमान्वये गेल्या ११ वर्षांत ३३ प्रकरणांत फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. .असा आहे व्याज दरतारण कर्जावर ९%,विनातारण कर्जावर १२%,इतर व्यक्तींना तारणावर १५%विनातारणावर १८% व्याज आकारण्याची मुभाबहुतांश सावकार बिगरशेती कर्ज दाखवून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्ज देत असल्याचे आढळून आले आहे..Illegal Money Lending : अमरावती जिल्ह्यात १३१ अवैध सावकार.जिल्ह्यातील सावकारी व्यवसाय - थोडक्यातपरवानाधारक सावकार ४९८एकूण कर्जवाटप १३०.०५ कोटी रुपयेएकूण कर्जदार ९१,९९६अवैध सावकारांवर कारवाई २४फौजदारी गुन्हे २परवाना निलंबन १.वर्षभरात १८१ शेतकरी आत्महत्याजानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत अमरावती जिल्ह्यात १८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नापिकी व कर्जबाजारीपणा ही प्रमुख कारणे असून, अनेक प्रकरणांत सावकारी कर्जाचा थेट संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.