Pune News: गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची लिटमस टेस्ट असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी आज रविवारी (ता.२१) झाली. या मतमोजणीत पुणे जिल्ह्यातील १७ पैकी १० नगरपालिकांवर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे..या निवडणुकीने पुणे जिल्ह्याचे अजित पवार ‘दादा’ असल्याचे सिद्ध केले, तर शिवसेना (शिंदे गट) ४ आणि भाजपला ३ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला एकही जागा मिळाली नाही..Maharashtra Local Body Election Results 2025: भाजप सुसाट! मुश्रीफांसह अनेक दिग्गजांना मोठा धक्का, जाणून घ्या कोण, कुठे विजयी?.उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव आणि चाकण या चार नगरपालिकांची जबाबदारी जुन्नरचे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार शरद सोनवणे यांच्याकडे देण्यात आली होती. या चारही नगरपालिका जिंकत आपली निवड त्यांनी सार्थ ठरवली. आंबेगावमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिष्ठेची केलेल्या निवडणुकीत बाजी मारत शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) राजश्री गांजळे विजयी झाल्या आहेत..इंदापूरला प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत भरत शहा (राष्ट्रवादी अजित पवार गट) विजयी झाले. त्यांनी बंडखोर प्रदीप गारटकर यांचा पराभव केला. सासवडला काँग्रेसमधून भाजपात आलेले संजय जगताप यांच्या मातोश्री आनंदी काकी जगताप विजयी झाल्या असून, त्यांच्या माध्यमातून भाजपने जिल्ह्यातील खाते उघडले. तसेच, भाजपने तळेगाव आणि आळंदी येथेही विजय मिळवला..Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Elections Result: मतदारांचा कौल कुणाला?; मतमोजणीला सुरुवात.बारामती - सचिन सातव (राष्ट्रवादी अजित पवार गट)लोणावळा - राजेंद्र सोनवणे - (राष्ट्रवादी अजित पवार गट)दौंड - दुर्गादेवी जगदाळे - (राष्ट्रवादी अजित पवार गट)तळेगाव दाभाडे - संतोष दाभाडे ( भाजपा महायुती)चाकण - मनिषा गोरे (शिवसेना शिंदे गट)जुन्नर - सुजाता काजळे (शिवसेना शिंदे गट)आळंदी - प्रशांत कुऱ्हाडे (भाजपा)शिरूर - ऐश्वर्या पाचरणे (राष्ट्रवादी अजित पवार गट).सासवड - आनंदी काकी जगताप (भाजपा)जेजुरी - जयदिप बारभाई (राष्ट्रवादी अजित पवार गट)भोर - रामचंद्र आवारे ( राष्ट्रवादी अजित पवार गट)इंदापूर - भरत शहा (राष्ट्रवादी अजित पवार गट)राजगुरूनगर -मंगेश गुंडाळ (शिवसेना शिंदे गट)वडगाव - आबोली ढोरे (राष्ट्रवादी अजित पवार गट)माळेगाव बुद्रुक (ता.बारामती) - सुयोग सातपुते (राष्ट्रवादी अजित पवार गट)मंचर - राजश्री गांजळे (शिवसेना शिंदे गट)फुरसुंगी ऊरूळी देवाची - संतोष सरोदे ( राष्ट्रवादी अजित पवार गट).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.