Pune News: राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी लोटल्यानंतर ऊस गाळपात खासगी, तर उताऱ्यात सहकारी साखर कारखाने आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत ८.६ टक्के सरासरी उताऱ्याने ५० लाख ६९ हजार ४४१ टन ऊस गाळप केला आहे. या गाळपातून ४ लाख ३६ हजार ७ टन साखरेचे उत्पादन झाले आहे..जिल्ह्यातील बारामती अॅग्रोने ऊस गाळपात आघाडी घेतली आहे. या खासगी कारखान्याने आतापर्यंत १० लाख २१ हजार ९७३ टन ऊस गाळप करत ७६ हजार ९६० टन साखरेचे उत्पादन केले आहे. दुसऱ्या क्रमांकावरही दौंड शुगर हा खासगीच कारखाना असून, त्याने ८ लाख ६६ हजार ९४० मेट्रिक टन ऊस गाळप करून ६४ हजार ७२० टन साखरेचे उत्पादन घेतले आहे..Sugarcane Payment Delay: राज्यातील १३२ कारखान्यांनी थकविली ‘एफआरपी’ रक्कम.सहकारी साखर कारखान्यांमध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ऊस गाळपात आघाडीवर आहे. सोमेश्वर कारखान्याने आतापर्यंत ४ लाख ३७ हजार ७८६ टन ऊस गाळप करून ४७ हजार ३९५ टन साखरेचे उत्पादन केले आहे. एकूण चित्र पाहता, जिल्ह्यातील ८ सहकारी साखर कारखान्यांनी मिळून २४ लाख ९६ हजार २५६ टन ऊस गाळप केला आहे. याउलट, केवळ ५ खासगी साखर कारखान्यांनी त्याहून किंचित जास्त म्हणजे २५ लाख ७३ हजार १८५ टन ऊस गाळप केला आहे..जिल्ह्यातील ८ सहकारी साखर कारखान्यांपैकी फक्त एका कारखान्याचा उतारा ८ टक्क्यांहून कमी आहे. त्याउलट, खासगी साखर कारखान्यांमध्ये केवळ एका कारखान्याला ८ टक्के किंवा त्याहून अधिक उतारा मिळवता आला आहे. शिरूर येथील पराग अॅग्रो या खासगी कारखान्याने २ लाख १८ हजार ९५२ टन ऊस गाळप करून १९ हजार टन साखरेचे उत्पादन घेत ८.२० टक्के उतारा नोंदवला आहे..Sugarcane Crushing: खानदेशातील कारखान्यांचे पाच लाख टन उसाचे गाळप.मात्र, गाळपाच्या तुलनेत साखर उताऱ्याकडे पाहिल्यास सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या कामगिरीत मोठी तफावत दिसून येते. सहकारी साखर कारखान्यांनी २ लाख २४ हजार ५०० टन साखरेचे उत्पादन करत सरासरी ९.८३ टक्के उतारा मिळवला आहे. त्या तुलनेत खासगी साखर कारखान्यांनी केवळ ७.४ टक्के उताऱ्यासह १ लाख ९० हजार ५०६ टन साखरेचे उत्पादन केले आहे..उताऱ्यात सोमेश्वर, माळेगाव अग्रस्थानीयंदाच्या गाळप हंगामात साखर उताऱ्याच्या बाबतीत सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सर्वाधिक आघाडीवर आहे. सोमेश्वर कारखान्याने १०.९२ टक्के उतारा नोंदवत पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल माळेगाव सहकारी साखर कारखाना १०.५४ टक्के उताऱ्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. माळेगाव कारखान्याने आतापर्यंत ४ लाख १३ हजार ४०० टन ऊस गाळप करून ४१ हजार ३८४ टन साखरेचे उत्पादन केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.