Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : खरिपाच्या पेरणीसाठी मॉन्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा

Kharif Hangam : सांगली जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. सध्या वाळवा आणि पलूस तालुक्यांतील शेतकरी त्यांच्या उपलब्ध पाण्यावर आगाप सोयाबीनचा पेरणा करण्यासाठी नियोजन करू लागला आहे.

Team Agrowon

Sangli Kharif Season News : सांगली जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. सध्या वाळवा आणि पलूस तालुक्यांतील शेतकरी त्यांच्या उपलब्ध पाण्यावर आगाप सोयाबीनचा पेरणा करण्यासाठी नियोजन करू लागला आहे. परंतु पेरणीसाठी अद्याप गती नसून शेतकरी पेरणीसाठी मॉन्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा करू लागला आहे.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ५६ हजार हेक्टर इतके क्षेत्र आहे. गतवर्षी खरीप हंगामातील पिकांची पेरणी २ लाख ५५ हजार ५१८ हेक्टरवर पेरा झाला होता.

यामध्ये सर्वाधिक सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी पेरणीपुर्व मशागती उरकल्या आहेत. पेरणीचे नियोजन करू लागला आहे. त्यानुसार बियाणे खरेदीसाठी शेतकरी पुढे येत आहे.

वास्तविक, वाळवा आणि पलूस तालुक्यांत आगाप सोयाबीन पेरणी केली जाते. कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे दोन्ही तालुके आहेत. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकरी आगाप सोयाबीन पेरणीचे नियोजन करत असतो.

यंदाच्या हंगामात सोयाबीन पेरणीचे नियोजन केले असून टोकणी आणि पेरणीची कामे हाती घेतली आहेत. शिराळा तालुक्यात धूळ वाफेवर भाताची पेरणी सुरू झाली आहे.

मिरज, तासगाव, आटपाडी, जत, कवठे महांकाळ तालुक्यात शेतकरी शेतीची मशागत करू लागला आहे. येत्या आठ ते पंधरा दिवसांत या दुष्काळी पट्ट्यात शेतकरी पेरणी करण्यासाठी पुढे येतील, असे चित्र आहे.

वेळेत पाऊस न झाल्यास पेरणी लांबणीवर पडणार

जिल्ह्यात यंदा वळीव पावसाने दडी मारली आहे. पेरणीसाठी जरी शेतकरी पुढे आला असला तरी पेरणीला फारशी गती नाही. शेतकरी मॉन्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा करू लागला आहे. वेळेत पाऊस न झाल्यास पेरणी लांबणीवर पडेल, असा अंदाज शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

सोयाबीन टोकणीसाठी सरी सोडली आहे. परंतु वाढत्या तापमानामुळे टोकणी थांबवली आहे. आता मॉन्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा करत आहे.
तात्यासो नागावे, खटाव, जि. सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT