Rain Forecast Agrowon
ॲग्रो विशेष

Waiting for Rain : तापलेल्या जमिनीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा

Rain Update : दोन्ही जिल्ह्यांमध्ये मागील सहा दिवसांपासून पाऊस हजेरी लावत असला तरी अद्याप पेरणीसाठी योग्य पाऊस झालेला नाही.

Team Agrowon

Dharashiv News : दोन्ही जिल्ह्यांमध्ये मागील सहा दिवसांपासून पाऊस हजेरी लावत असला तरी अद्याप पेरणीसाठी योग्य पाऊस झालेला नाही. रविवारी (ता. ९) सायंकाळी दोन्ही जिल्ह्यांत दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावली.

मात्र, पेरणीसाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. मागील काही दिवसांत पाऊस पडूनही जमिनीत पेरणीसाठी आवश्यक खोलीपर्यंत ओल झालेली नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. यंदा कडक उन्हाळा होता. त्यामुळे जमिनी मोठ्या प्रमाणात तापली होती. तापलेल्या जमिनीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

यंदा अवकाळी पावसाने कमीअधिक प्रमाणात दोन्ही जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली. नाल्यांना पाणी येईपर्यंत पाऊस पडला. मात्र, दुसरीकडे कडक ऊन्हाळा कायम होता. कडाक्याच्या उन्हात पडलेला पाऊस नामशेष झाला. पावसाळा सुरू झाल्यानंतरही हिच परिस्थिती आहे. कडक ऊन असल्याने पडलेल्या पावसाचा परिणाम दिसून येत नाही.

दोन दिवसांत पाऊस सलग हजेरी लावत असला तरी पेरणीसाठी तो समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांनी अजून चाड्यावर मूठ धरलेली नाही. दरवर्षीच्या तुलनेत उन्हाची तीव्रता वाढत असून उन्हामुळे तापलेली जमिन आतापर्यंतच्या पावसाने अजून थंडच झाली नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

धाराशिवला आतापर्यंत ७७ मिमी पाऊस

धाराशिव जिल्ह्यात रविवारी सायंकाळी १५.६ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावली. यात सर्वाधिक पाऊस तुळजापूर तालुक्यात झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७७.७ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय रविवारी (ता. ९) पडलेला पाऊस व कंसात आतापर्यंत पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे ः धाराशिव - १४.६ (५५.७), तुळजापूर - २८.३ (१००.४), परंडा - १५ (८६.४), भूम - १६.६ (८७.८), कळंब - ७.८ ( ४१), उमरगा - १४.३ (१०३.९), लोहारा - ५.७ (६६.२), वाशी - १३.३ (९२.२)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT