Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Crop Insurance : कापूस पीकविम्याच्या परताव्यांची जळगावात प्रतीक्षा

Crop Damage : खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून- जुलै महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने व सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे कापसासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून- जुलै महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने व सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे कापसासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

अशात पीकविमा योजनेतून मंजूर परतावे किंवा नुकसानीची रक्कम पात्र शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.

शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या, शेतकरी संघटनेने या प्रश्नी आंदोलनाची भूमिका घेतली, निवेदन दिले, पण प्रशासन, विमा कंपनीने दखल घेतलेली नाही.

शेतीमालाचे नुकसान भरून निघावे, यासाठी शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना लागू केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना काही हजार रुपयांची मदत मिळविण्यासाठी विमा कंपन्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस पीकविम्याची परतावा रक्कम त्वरित द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यातील सुमारे ४ लाख ५५ हजार ७७९ शेतकरी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kidney Sale Case: किडनी विक्री प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन

Greenfield Highway: नाशिक-सोलापूरदरम्यान ‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’

Manmad APMC: मनमाड बाजार समितीमध्ये आता ऑनलाइन कामकाज

Agriculture Commissioner Promotion: कृषी आयुक्त सूरज मांढरे यांना सचिवपदी पदोन्नती

Rice Variety: ‘ट्रॉम्बे कोकण महान’ भाताची जात प्रसारित

SCROLL FOR NEXT