Chandrapur News: रोशन खुळे किडनी विक्री प्रकरणाच्या तपासात बांगलादेशातून पीडित नागरिकांना भारतात आणून त्यांच्या किडन्या काढल्या जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार सोलापूरचा रामकृष्ण सुंचू ऊर्फ डॉ. कृष्णा असून दोनशे कोटींपेक्षा अधिकची उलाढाल यातून झाल्याचे सांगण्यात आले..तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सुंचूच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ६० ते ७० जणांच्या किडन्या काढून तमिळनाडू राज्यातील त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीरपणे प्रत्यारोपण करण्यात आले. या हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी, दिल्लीचे डॉ. रवींद्रपाल सिंग आणि रामकृष्ण सुंचू यांच्यात थेट संपर्क असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे..Kidney Trafficking Case: किडनी विक्री प्रकरणातील दिल्लीतून एकाला अटक.सुंचूच्या मोबाइल कॉल डिटेल रेकॉर्ड्सचा समावेश असलेल्या सुमारे चार हजार पानांचे विश्लेषण करण्यात आले असून, या डेटामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरजू व्यक्तींना हेरून त्यांना तामिळनाडू येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवण्याचे काम सुंचू करत असे..त्याने बांगलादेशात स्वतंत्र एजंटांचे जाळे उभे केले होते. त्या एजंटांच्या माध्यमातून पीडितांना आधी पश्चिम बंगालमध्ये आणले जात असे. तेथे बनावट भारतीय आधार कार्ड तयार करून पुढील प्रक्रिया पूर्ण केली जात होती. यानंतर डॉ. राजरत्नम आणि डॉ. रविंद्रपाल सिंग यांच्या मदतीने किडनी काढण्याच्या शस्त्रक्रिया केल्या जात..Kidney Sale Case: पंजाबचा हिमांशू किडनी विक्री प्रकरणात होता कार्यवाहक.सुंचू पीडितांची निवड करताना विशेष काळजी घेत असल्याचेही तपासात दिसून आले आहे. महाराष्ट्रातून त्याने फारच मर्यादित पीडितांची निवड केली. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतील गरजूंवर त्याचा विशेष भर होता. तपासात मिळालेल्या रक्ततपासणी कागदपत्रांनुसार बहुतेक पीडितांचा रक्तगट ‘ओ’ असल्याचे आढळले आहे. अटकेत असलेले डॉ. रवींद्रपाल सिंग यांना आज (ता. २) चंद्रपूर न्यायालयात हजर करण्याचे आदेश तपासयंत्रणेला देण्यात आले आहेत..अनेक डॉक्टर रडारवरसध्या डॉ. राजरत्नम फरार असून, सुंचू, डॉ. राजरत्नम आणि डॉ. रवींद्रपाल सिंग यांचे परस्पर संबंध तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. या प्रकरणात देशातील आणखी काही प्रतिष्ठित डॉक्टरांची नावे पुढे येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.