New Delhi News: केंद्र सरकारने महाराष्ट्राला नववर्षाची भेट देताना नाशिक ते सोलापूरदरम्यान १९ हजार १४२ कोटी रुपये खर्चाचा सहा पदरी ‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’ (३७४ किलोमीटर) विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. .उत्तर ते दक्षिण महाराष्ट्राला सहापदरी महामार्गाने जोडणारा हा प्रकल्प महाराष्ट्रासह तेलंगण, आंध्रप्रदेश या राज्यांची जीवनरेखा बनेल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे..Shaktipeeth Highway Dispute: ‘शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल नको’.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक ते दक्षिण महाराष्ट्रातील अक्कलकोट (जि. सोलापूर) असा हा सहा पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉर विकसित करण्यासह ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३२६’ चे ओडिशामध्ये १ हजार ५२६ कोटी रुपये खर्चून २०६ किलोमीटरपर्यंत रुंदीकरण आणि विस्तारीकरण करण्यास मंजुरी दिली. माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारांशी बोलताना या मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती दिली..Samrudhhi Highway Facilities : ‘समृद्धी’वरील स्वच्छतागृहांमध्ये ना पाणी, ना देखभाल .प्रकल्पाचे ८० टक्के भूसंपादन पूर्णमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ‘‘या प्रकल्पाची ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर उभारणी होणार आहे त्यासाठी ३ हजार १२२ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाची आवश्यकता असून त्यावर ३ हजार ८५३ कोटी रुपये खर्च होतील. या प्रकल्पासाठी ८० टक्के भूसंपादन झाले आहे. सोळा टक्के जमिनीच्या अधिग्रहणासाठी अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. उर्वरित चार टक्के जमिनीचे संपादन शिल्लक आहे.’’.केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील नाशिक ते सोलापूर या सहा पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. पीएम गतिशक्तीशी सुसंगत असलेला हा परिवर्तनकारी प्रकल्प प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करेल. पश्चिम–पूर्व संपर्क यामुळे अधिक मजबूत होईल. लॉजिस्टिकला चालना मिळून रोजगारनिर्मितीही होऊ शकेल. आर्थिक विकासाला चालना मिळेल.नरेंद्र मोदी, पंतप्रधान.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.