Turmeric Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Rate : वायगाव हळद बेण्याच्या किमतीत दुपटीने वाढ

Team Agrowon

Vardha News : यंदा जागतिक स्तरावर हळदीची वाढती मागणी वाढल्याने भावात मोठी वाढ झाली. त्यामुळे दरवर्षी वायगाव हळदीचे मातृ कंद सहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे मिळत होते. त्याचे भाव आता १२ हजार रुपये प्रती क्विंटलवर गेले आहेत. परिणामी बेणे मिळणे कठीण झाले आहे. ओली हळद कांडी शेंग गतवर्षी ३० ते ४० रुपये प्रति किलो मिळायचे आता ते ८० रुपये प्रति किलोवर गेले आहे.

गतवर्षी हळदीला अपेक्षेपेक्षा जादा भाव मिळाले. त्यामुळे यंदा हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळदीला चांगला भाव मिळत असल्याने राज्यातून बियाण्यांची मागणी वाढली आहे. परिणामी बियाण्याच्या किमती गगनाला भिडल्या आहे.

यावर्षी सुकलेल्या हळद कांडीला २२ हजार ते २७ हजारपर्यंत भाव मिळाले आहे. सरासरी २५ हजार रुपये किमतीने शेतकऱ्यांनी हळद कांडीची विक्री केली. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी दुपटीने भाव मिळाले. गत वर्षात हळद पावडर २०० रुपये किलो प्रमाणे मिळायचा यावर्षी ३०० रुपये किलोप्रमाणे ग्राहकांना घ्यावा लागत आहे. समुद्रपूर तालुक्यात १९० हेक्टरमध्ये वायगाव हळद लागवडीचे क्षेत्र आहे. यावर्षी ते वाढून २२० हेक्टर होण्याची शक्यता कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात वायगाव हळदीची महती इतर देशात पोहोचल्याने मागणीत वाढ झाली आहे. इतर हळद जातीच्या उत्पादनाला यावर्षी अधिक भाव मिळत असल्याने त्याचा फायदा वायगाव हळद उत्पादकांना होत आहे.

वाढीव दरामुळे बियाणे राखण्याकडे दुर्लक्ष

गत वर्षात वायगाव हळदीला मिळालेल्या दरामुळे येथील उत्पादकांनी त्यांच्याकडे असलेली हळद विकण्याकडे अधिक लक्ष दिले. यामुळे आता शेतकऱ्यांकडे पेरणीकरिता मातृकंद शिल्लक नाही. अशात वायगाव हळदीला राज्यात मागणी होत आहे. असे असताना येथील उत्पादक कंपन्या त्यांना बियाणे पुरविण्यात असक्षम ठरत आहेत.

जागतिक पातळीवर वायगाव हळदीची महती कळायला लागल्याने मागणीत वाढ झाली. मात्र उत्पादन कमी आहे. त्यामुळे किमतीत दुपटीने वाढ झाली. शेतकऱ्यांना चांगले बाजारभाव मिळाले. यावर्षी २० टक्के लागवड क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे वायगाव हळदीला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
मनोज गायधने , कृषी पर्यवेक्षक, गिरड
भाव वाढीमुळे संपूर्ण राज्यातून वायगाव हळदीच्या मातृ कंदाची मागणी वाढली आहे. मात्र, आमच्याकडे बियाणे उपलब्ध नाही. बाजारभाव चांगला मिळत असल्याने आम्ही बियाणे विक्री पेक्षा वाळलेली हळद विक्रीकडे लक्ष केंद्रित केले. यामुळे बियाणे उपलब्ध राहिले नाही. पुढील वर्षात भाव वाढीच्या कारणाने लागवड क्षेत्रात निश्चित वाढ होणार आहे.
विठ्ठल कारवटकर, संचालक, विदर्भ नैसर्गिक शेतमाल उत्पादक कंपनी, गिरड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT