Maharashtra Election Agrowon
ॲग्रो विशेष

Satara Assembly Election : सातारा जिल्ह्यात आठ मतदार संघांसाठी मतदान

Maharashtra Election 2024 : लोकसभा निवडणुकीत अनेक तरुण मतदारांनी मतदान करतानाचे व्हिडिओ करत त्याचे रिल्स बनविले होते. या विधानसभा निवडणुकीत प्रशासनाने खबरदारी घेत मोबाईल बाहेर ठेवण्याचे आदेश दिले होते.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात सकाळी सात वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीच्या मतदानास सुरुवात झाली होती. शहरातील अनेक केंद्रांवर सकाळच्या टप्प्यात मतदारांनी रांगा लावल्याचे दिसून आले.

मात्र, जिल्ह्यात अटीतटीची व चुरस असणाऱ्या कोरेगाव, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, माण-खटाव, पाटण, वाई, सातारा, फलटण या मतदार संघांतील गावागावांत मतदारांना घराबाहेर काढून मतदान करून घेण्यासाठी दिवसभर सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांची चढाओढ सुरू असल्याचे पाहावयास मिळाले.

राजकीय संवेदनशील असणाऱ्या अनेक मतदान केंद्रांवर निवडणूक यंत्रणेच्‍या मार्फत ड्रोनद्वारे नजर ठेवण्‍यात आली होती. जिल्ह्यात दुपारी तीनपर्यंत आठ मतदार संघात पाच वाजेपर्यंत ६४.३३ टक्के मतदान झाले.

लोकसभा निवडणुकीत अनेक तरुण मतदारांनी मतदान करतानाचे व्हिडिओ करत त्याचे रिल्स बनविले होते. या विधानसभा निवडणुकीत प्रशासनाने खबरदारी घेत मोबाईल बाहेर ठेवण्याचे आदेश दिले होते.

त्यामुळे पोलिस कर्मचारी मतदारांना मोबाईल बाहेर ठेवण्यास सांगत होते. त्यामुळे केंद्रामध्ये मोबाईल नेण्यावरून पोलिस कर्मचारी व मतदारांमध्ये अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडल्याचे चित्र दिसून आले. मतदानाचा टक्का वाढावा व केंद्रामध्ये आल्यावर मतदारांना प्रसन्न वाटावे या उद्देशाने शहरासह उपनगरांमध्ये अनेक मतदान केंद्राना आकर्षक पद्धतीने सजविलेले होते. आकर्षक प्रवेशद्वारही सजावटीचे वैशिष्ट्ये ठरली.

दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रशासनाकडून रिक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच केंद्रातही त्यांना मतदान करेपर्यंत मदत करण्यात येत होती. दिव्यांगाप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः ज्यांना चालण्याची अडचण आहे. अशा मतदारांना व्हिलचेअरची व्यवस्था होती. ज्येष्ठांना रांगेत उभे राहू लागू नये यासाठी प्रशासनाने बैठक व्यवस्था देखील केली होती.

जिल्ह्या‍त ४३ मतदान केंद्रे संवेदनशील असल्‍याचे पाहणीत समोर आले होते. बहुतांश अशा केंद्रांसह परिसरातील हालचाली टिपण्‍यासाठी ड्रोनची मदत घेण्‍यात आली. आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनद्वारे मिळणाऱ्या माहितीनुसार त्‍याठिकाणी उपाययोजना राबविण्‍यासाठी पोलिस दल सक्रिय होते. दुपारी पाचपर्यंत आठ मतदार संघांत ६४.३३ टक्के मतदान झाले होते. यामध्ये सर्वाधिक कोरेगाव व सर्वांत कमी सातारा येथे मतदान झाले होते.

केंद्र प्रमुखाला हृदयविकाराचा धक्का

खंडाळा तालुक्यातील मोर्वे येथे मतदान करताना निवृत्त लेखा परिक्षक शाम नानासाहेब धायगुडे (वय ६७) यांचा हृदयविकाराचा धक्काने मृत्यू झाला, तर डांगेघर मतदान केंद्रावरील केंद्र प्रमुखाला हृदयविकाराचा धक्का बसला त्यांना उपारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

Gokul Milk : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; आता ‘गोकुळ’ निशाण्यावर

Jalgaon Assembly Election Result 2024 : खानदेशात महायुतीची मुसंडी; काँग्रेसचे दिग्गज पराभूत

Rohit Patil NCP-SP : राज्यातला सर्वात तरूण आमदार राष्ट्रवादीचा; वय अवघे...

Maharashtra Assembly Result 2024 : अहिल्यानगर, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा ‘सुपडासाफ’

SCROLL FOR NEXT