Maharashtra Assembly Election 2024 : पुणे जिल्ह्यात उत्साही वातावरणात मतदान

Vidhansabha Election 2024 : पुणे जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत ४१.७० टक्के मतदान झाल्याने जिल्ह्यातील २१ जागांसाठी ३०३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election Agrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यात ८४६२ केंद्रांवर बुधवारी (ता.२०) सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. सकाळी थंडीमुळे सुरुवातीला नागरिकांचा प्रतिसाद कमी होता. मात्र, नऊ वाजल्यानंतर थंडी कमी झाल्यानंतर नागरिक बाहेर पडल्याने मतदान केंद्रांवर गर्दी झाली होती. जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत ४१.७० टक्के मतदान झाल्याने जिल्ह्यातील २१ जागांसाठी ३०३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

बुधवारी (ता.२०) विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यातील शिरूर, बारामती मतदार संघांत किरकोळ वाद झाले. विशेषतः महिला व युवक मतदारांमध्ये उत्साह होता. मतदारांना ने-आण करण्यासाठी रिक्षा, मोटारसायकल व चारचाकी वाहनांचा उपयोग केला जात होता. सर्वच पक्षाचे कार्यकर्ते मतदानाची आकडेवारी वाढविण्यासाठी धावपळ करत होते. निवडणूक आयोगाच्या नजरेत दिसणार नाही, अशा पद्धतीने काही गावांमध्ये मतदारांसाठी पिण्याच्या  पाण्याची व नाष्ट्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election 2024 : चार हजार उमेदवारांचे आज भवितव्य ठरणार

राज्यात चर्चिली गेलेल्या बारामती विधानसभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व युगेंद्र पवार यांच्यात थेट लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी सहकुटुंब काटेवाडी येथे मतदान केले. तर, इंदापूरमध्येही माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे यांनीही मतदान केले. खेड, जुन्नर, शिरूर, दौंड, पुरंदर, भोर, आंबेगाव, मावळ व पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारांनी सकाळीच मतदान केले.

शिरूर मतदारसंघात वाघोली येथे मतदान होताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पोलिंग एजंटला दमदाटी झाल्याचा आरोप महाविकास आघाडीचे अशोक पवार यांनी केला. याबाबत चौकशी करून त्यावर कारवाई झाली नाही, तर मी त्वरित उपोषण सुरू करेन, असा इशारा त्यांनी दिला. तर, बारामतीत महात्मा गांधी बालक मंदिर या केंद्रावर गैरप्रकार होत असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला.

या ठिकाणी अजित पवार व शरद पवार गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती कळताच शर्मिला पवार त्या ठिकाणी पोहचल्या. त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार हेही तेथे पोहचले. पुणे कँटोन्मेंट मतदार संघात गोल्डन ज्युबली इन्स्टिट्यूटच्या केंद्राजवळ काँग्रेसने तडीपार गुंड पप्पू जाधव याला हाताशी धरून १०० मीटरच्या आत  मतदारांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले.

Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात लोकशाहीचा लोकोत्सव, ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान; अनेक ठिकाणी मशीनमध्ये बिघाड

याबद्दल भाजपचे उमेदवार आमदार सुनील कांबळे यांनी त्यावर आक्षेप घेतल्याने काँग्रेसच्या सुरेखा खंडागळे व अन्य कार्यकर्त्यांकडून सुनील कांबळे व भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली.

पुणे शहरातही विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी निवडणुकीचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी कोथरूड विधानसभा मतदार संघात पाषाण येथील मतदान केंद्र १२२ येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर अधिकारी व कर्मचारी, मतदारांशी संवाद साधला. पुणे जिल्ह्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत ५.५३ टक्के एवढे मतदान झाले.

यामध्ये कसबा मतदार संघात सर्वाधिक ७.४४ टक्के एवढे मतदान झाले होते. इतर मतदार संघांत मतदानाची टक्केवारी कमी होती. तर ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात १५.६४ टक्के मतदान झाले. तर, जुन्नरमध्ये १८.५७ टक्के, तर कसबा मतदार संघात १८.३३ टक्के मतदान झाले. इतर मतदार संघात कमी-अधिक मतदानाची टक्केवारी होती.

त्यानंतर मतदारांचा ओघ वाढल्याने अनेक मतदारांनी मतदान केले होते. जिल्हयात दुपारी एक वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी आंबेगाव मतदार संघात सर्वाधिक ३५.६३ टक्के मतदान झाले होते. जुन्नरमध्ये ३४.५८ टक्के, मावळमध्ये ३४.१७ टक्के, बारामतीत ३३.७८ टक्के, खेड-आळंदीमध्ये ३२.०३ टक्के, दौंडमध्ये ३१.७८, कसबा ३१.६७ टक्के मतदान झाले होते.  

पुणे जिल्ह्यात सुरुवातीपासून शेती आणि शेतकरी प्रश्न बाजूला पडले होते. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, राज ठाकरे, देंवेद्र फडणवीस, अजित पवार अशा प्रमुख राजकीय व्यक्तींच्या सभा ठिकठिकाणी झाल्या होत्या. परंतु आरोप-प्रत्यारोप आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीत रंगत आली होती. त्यामुळे प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी याचा कितपत फायदा उमेदवारांना होणार आहे. ते निकालानंतर स्पष्ट होणार आहे.  

२१ मतदार संघांत सरळ लढत

जिल्ह्यातील २१ मतदार संघांत महायुती आणि महाविकास आघाडी अशी सरळ लढत होत आहे. मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे उमेदवारही काही मतदार संघांत आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये माजी जलसंपदामंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, राहुल कुल, संजय जगताप, संग्राम थोपटे, अशोक पवार, दिलीप मोहिते पाटील, दत्ता भरणे, अतुल बेनके हे उमेदवार आहेत. पुणे शहरातील आठ मतदार संघांत प्रामुख्याने माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, रवींद्र धंगेकर, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, सुनील टिंगरे हे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com