Sugar Factory Election Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory Election: ‘छत्रपती’साखर कारखान्याकरिता आज मतदान, माळेगाव निवडणूक २२ जून रोजी

Cooperative Election 2025: छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीची धूळ बसण्याआधीच माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला सुरुवात झाली आहे. २२ जून रोजी मतदान व २४ जून रोजी मतमोजणी होणार असून, प्रचारासाठी फक्त आठ दिवस दिले गेले आहेत.

गणेश कोरे

Pune News: छत्रपती सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी रविवारी (ता. १८) शांत होते न होते. तोपर्यंत लगेच माळेगावची (ता. बारामती) रणधुमाळी सुरू झाली आहे. बुधवार (ता. २१) पासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत, तर मतदान २२ जून रोजी होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. यामुळे छत्रपती कारखान्यापाठोपाठ आता ‘माळेगाव’च्या निवडणुकीचा फड रंगणार आहे.

माळेगाव साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक मार्चमध्येच लागणार होती. मात्र अंतिम मतदार यादीबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या तक्रारीचा योग्य तो निर्णय होईपर्यंत ही निवडणूक पुढे ढकलण्यात येत आहे, असा आदेश सहकार विभागाने ९ मार्चला काढला होता. दरम्यानच्या कालावधीत तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी तयार केलेल्या निवडणूक वेळापत्रक कार्यक्रमालाही शासनस्तरावर मंजुरी मिळाली नव्हती. परिणामी, माळेगाव कारखान्याची निवडणूक आता दिवाळीपर्यंत पुढे जाते की काय, अशी कारखाना कार्यक्षेत्रात शंका उपस्थित होत होती.

दरम्यान, उच्च न्यायालयातील तक्रारीही निकाली निघाल्या आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी वैभव नावडकर यांची ‘माळेगाव’च्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली व हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांची नियुक्ती केली. त्यामुळे पुन्हा निवडणुकीचे संकेत मिळाले होते. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १५) अशोक गाडे व यशवंत माने यांनी ‘माळेगाव’चे निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

प्रचाराला आठच दिवस

माळेगाव कारखान्यामध्ये ‘छत्रपती’ पॅटर्न वापरला जाणारा की दुरंगी अथवा तिरंगी लढत होणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. मतदान कार्यक्रमात माघार घेण्यासाठी तब्बल १५ दिवस दिले असून, प्रचारासाठी मात्र आठच दिवस मिळणार असल्याने इच्छुकांची तारांबळ उडणार आहे.

निवडून द्यायचे प्रतिनिधी एकूण २१

सर्वसाधारण गट- १५- माळेगाव (३), सांगवी (३), पणदरे (३), खांडज (२), नीरा वागज (२), बारामती (२). ब वर्ग प्रतिनिधी- १. अनुसूचित जाती/जमाती- १. महिला- २. इतर मागासवर्ग- १. भटक्या विमुक्त जाती जमाती- १.

...असा आहे निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करणे- २१ ते २७ मे

उमेदवार यादी प्रसिद्धी- २१ ते २७ मे

अर्ज छाननी- २८ मे

वैध उमेदवार यादी प्रसिद्धी- २९ मे

उमेदवारी अर्ज माघार मुदत- २९ मे ते १२ जून

अंतिम यादी व चिन्हवाटप- १३ जून

मतदान- २२ जून

मतमोजणी- २४ जून

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Purpravan Gave: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६५ गावे पूरप्रवण

Alu Farming Success: वर्षभर अळूला तयार केली बाजारपेठ

Farmer ID for Loan Waiver : २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य?

Saline Soil Farming Success: अभ्यासूवृत्तीतून खारपाणपट्ट्यात यशस्वी शेती

Tractor Taxation Debate: ‘लक्झरी कार’चा कर ट्रॅक्टरला कशासाठी?

SCROLL FOR NEXT