Cooperative Society Election : लासलगाव खरेदी-विक्री संघावर ‘प्रगती’ पॅनेलची सत्ता

Cooperative Election : सर्वसाधारण वैयक्तिक सभासदांमधून १,९४५ मतदारांपैकी १,३४५ मतदान झाले. संस्था सभासद गटातून ३८ पैकी ३६ मतदान झाले. सर्वसाधारण मतदारसंघातून ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते.
APMC Election
APMC ElectionAgrowon
Published on
Updated on

Nashik News : लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनेलचे नेते नानासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनेलने सर्व १७ जागांवर निर्विवाद विजय मिळविला आहे. श्री.पाटील यांनी एक हाती सत्ता राखली आहे.

निवडणुकीसाठी एकूण ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते. माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत जिवाबाई शिवाजी जाधव (महिला), निर्मला राजाराम मेमाणे (महिला), शंतनू नानासाहेब पाटील (इ. मा.), धोंडीराम त्र्यंबक धाकराव (अनु. जाती/जमाती ), शंकरराव किसनराव कुटे (भ. वि. जाती/जमाती) असे ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १२ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैभव मोरडे व सचिन काकडे यांनी कामकाज बघितले.

APMC Election
Cooperative Elections: ‘नीरा-भीमा’साठी दहा अर्ज दाखल

सर्वसाधारण वैयक्तिक सभासदांमधून १,९४५ मतदारांपैकी १,३४५ मतदान झाले. संस्था सभासद गटातून ३८ पैकी ३६ मतदान झाले. सर्वसाधारण मतदारसंघातून ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. संस्था सभासद या मतदारसंघातून १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात होते.

श्री. नानासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलच्या उमेदवाराविरुद्ध कोळगाव येथील एक उमेदवार अशी लढत झाली. वैयक्तिक सभासद गटातून सर्वात जास्त मते राजाभाऊ बाबूराव दरेकर यांना मिळाली तर सर्वात कमी घोटेकर अनिल महिपत यांना मिळाली. दोन्ही मतदारसंघांमध्ये प्रगती पॅनेलचे सर्व १२ उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले.

APMC Election
Cooperative Election : सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजला

सर्वसाधारण(वैयक्तिक सभासद) या मतदारसंघात एकूण १३४५ मतदान झाले. त्यातील उमेदवारांना मिळालेली मते अशी विलास नवनाथ आहेर (१२४३), प्रकाश कारभारी कापडी (१२४६), अनिल जगन्नाथ घोटेकर (१२२६), रंगनाथ महिपत घोटेकर (२५१) (पराभूत), जनार्दन राजाराम जगताप (१२४०), किशोर भास्करराव दरेकर (१२५५), राजाराम बाबूराव दरेकर (१२६१), राजाराम माधवराव दरेकर (१२४९), शांताराम संपतराव नागरे (१२१२), अरुण रामभाऊ बडवर (१२४१),सुरेश नथू रायते (१२४९), अनिल पोपट शिंदे (१२१०). संस्था सभासद मतदारसंघातील उमेदवारांची मते अशी नितीन केदारनाथ घोटेकर (२६, विजयी), रंगनाथ महिपत घोटेकर (१० पराभूत).

संघाचा पारदर्शक कारभार आणि संस्थेच्या प्रगतीसाठी केलेली लोकाभिमुख कामे यामुळे सभासदांचा विश्वास आमच्यावर आहे. प्रगती पॅनेलला निर्विवाद बहुमत दिल्याने आणि माझ्या कारकिर्दीतील कामांची पावती दिल्याने मी सर्व सभासदांचा खूप ऋणी आहे.
–नानासाहेब पाटील, प्रगती पॅनेलचे नेते, लासलगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com