Vithhal Rukmini Mandir  Agrowon
ॲग्रो विशेष

Chaitra Yatra Pandharpur : विठ्ठल-रुक्मिणीचे यंदाच्या चैत्री वारीत फक्त मुखदर्शनच

Pandharpur Vitthal Mandir : यंदाच्या यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे फक्त मुखदर्शनच घेता येणार आहे,’’ असे प्रातांधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.

सुदर्शन सुतार

Pandharpur News : ‘‘चैत्री शुद्ध एकादशी शुक्रवारी (ता. १९) आहे. चैत्री यात्रा कालावधीत विठ्ठल- रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. यंदाच्या यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे फक्त मुखदर्शनच घेता येणार आहे,’’ असे प्रातांधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.

‘‘सध्या उन्हाळा सुरू असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व औषधोपचारांसाठी आवश्यक असलेली सर्व सामग्री उपलब्ध ठेवावी,’’ अशा सूचनाही इथापे यांनी दिल्या.

चैत्री यात्रा नियोजनाबाबत प्रांत कार्यालयात आयोजित बैठकीत इथापे बोलत होते. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता अमित निमकर, नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, उपमुख्याधिकारी सुनील वाळुंजकर, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाढ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न भातलवंडे आदी उपस्थित होते.

श्री. इथापे म्हणाले, ‘‘मंदिर समितीने दर्शन रांग व पत्रा शेडमध्ये पंखे, कूलर्स मॅट, स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. भाविकांना तत्काळ व सुलभ दर्शन व्यवस्थेबाबत नियोजन करावे.

यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांसाठी मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नगरपालिकेने नियोजन करावे. आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याची टँकरची संख्या वाढवावी. नदीपात्रातील व घाटाची स्वच्छता करावी, अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करावी. अन्न व औषध प्रशासनाने खाद्य पदार्थांच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी पथके नेमून मोहीम राबवावी.’’

१५ ते २१ एप्रिलपर्यंत मुखदर्शनाची वेळ वाढवणार

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शेळके म्हणाले, ‘‘श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने सद्यःस्थितीत श्रींचे पदस्पर्श दर्शन बंद करून फक्त पहाटे पाच ते सकाळी अकरापर्यंत मुखदर्शन भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र चैत्री यात्रेला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन १५ ते २१ एप्रिल या कालावधीत पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तसेच दर्शनरांगेसाठी कायमस्वरूपी चार पत्राशेड व तात्पुरते चार असे एकूण आठ पत्राशेड उभारण्यात येत आहेत. दर्शनरांगेत मॅट टाकणे, बसण्याची सुविधा, पिण्याचे पाणी, शौचालये, विश्रांती कक्ष दर्शनरांगेत दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी भाविकांना मोफत लिंबू सरबत, मठ्ठा व खिचडी वाटप करण्यात येईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT